लोणार-वनविभागाच्या वतीने सांडपाणी प्रकल्पा जवळ लाखो रुपये खर्च करुन चौकी बांधली पण मागील तीन वर्षापासून ती धूळखात व कुलूबंद असल्याचे निर्देशणास येत आहे.
वनविभागाच्या वतीने किन्ही रोडवर व सांडपाणी प्रकल्पा जवळ वनचौकी बांधण्यात आली या ठिकाणी कर्मचारी ही तैनात करण्यात आले परंतू सांडपाणी प्रकल्पा जवळील चौकी कायमस्वरुपी बंद रहात असल्याने या ठिकाणी आजूबाजूला झाडे वाढल्याने घानकचरा साचल्याने याकडे वनविभागाचे जाणीवपूर्वक दूर्लक्ष होताना दिसून येते.एककीकडे लोणार विकास आराखड्या अंतर्गत करोडो रुपायाचा निधी मंजूर केल्या जात असताना दूसरीकडे माञ लाखो रुपायाचा चूराडा करुन बांधण्यात आलेली चौकी धूळखात पडल्याने या विकासत्मक निधीचा फायदा होताना दिसून येत नाही.पर्यटकांच्या व सरोवर संवर्तधन व जतनासाठी बांधण्यात आलेली चौकी सूरु करावी अशी मागणी सरोवर प्रेमी नागरींकां कडून होत आहे
Buldhana