प्रतिनिधी..जगन पाटिल
लोणार तालुक्यातील ग्रामिण भागातील ० ते ५ वयोगटातील ९ हजार ६३६ बालकांना रविवार २७ फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओचा डोस पाजण्यात येणार असून सर्व मातांनी आपल्या बालकास पोलिओ डोस पाजून घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ दैवशाला बलशेटवाड यांनी केले आहे . सायंकाळी ५ वाजेपर्यंत बालकांना पोलिओ डोस पाजला जाणार आहे यामध्ये यापुर्वी डोस पाजला असेल तरी पण , बाळ नुकतेच जन्मले असले तरी पण , बाळ आजारी असेल तरी सुध्दा २७ तारखेला पोलिओ डोस पाजणे गरजेचे आहे . हा पोलिओ डोस सर्व प्राथमिक केंद्र , सर्व उपकेंद्र , सर्व अंगणवाडी केंद्रात उपलब्ध करून दिला जाणार आहे . पोलिओना हद्दपार करण्यासाठी दर वर्षी पल्स पोलिओ मोहिम राबवली जाते २३ जानेवारी रोजी आयोजीत पल्स पोलिओ मोहिम कोरोना संसर्गामुळे २७ फेब्रुवारी रोजी राबविली जात आहे मोहिम यशस्वी करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने तयारी केली असल्याची माहिती २५ फेब्रुवारी रोजी तालुका आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.