लॉकडाऊन च्या काळात सरकारने दिव्यांग,गोरगरीब जनतेसाठी उपाययोजना करा

 

अपंग नेते शेख अनिस पत्रकार याची सरकार ला मागणी
अमरावती :-गेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक हाल गोरगरीब जनतेचे दिव्यांग बंधू-भगिनी चे आणि हातावर पोट असणाऱ्यांना गोरगरीबांचे झाले आहेत.पुन्हा त्यांना कसलाही त्रास न व्हावा यासाठी राज्य सरकारने आताच काही उपाययोजना त्या गरजू व्यक्तींसाठी करण्याची आवश्यकता आहे. आज त्यांच्यासाठी काही केले गेले नाही तर ते उपाशीपोटी होरपळून जातील व कोरोणा या बिमारी पेक्षाही उपासमारी ही अत्यंत घनघोर बिमारी असून त्यापासून ते आपले जीवन सुरक्षित ठेवू शकत नसल्या कारणाने सर्वप्रथम त्यांच्या जीवनाकडे व आरोग्याकडे लक्ष पुरविणे हेच आरोग्य दिवसाचे सरकारचे एक महत्त्वपूर्ण सामाजिक भूमिका राहील.एकीकडे महाराष्ट्र मध्ये सूर्याची किरणे अत्यंत तापत असताना काम नसल्याकारणाने व पैशाअभावी एक वेळेस जेवन पोटात नसताना त्या भयानक तापमान परिस्थितीला तोंड देण्यासाठी सभाव्य व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमी होते व त्यांना आपले प्राण गमवावे लागतात.खऱ्या अर्थाने सर्व सामाजिक संस्थांनी सरकारी यंत्रणांनी या गोष्टीचा विचार करून गोरगरीब जनतेला व दिव्यांग व्यंक्ती, निराधार महिला या सर्वांना सहकार्य करावे असे आव्हान अपंग नेते तथा अध्यक्ष अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य शेख अनिस पत्रकार यांनी सरकारकडे प्रसिद्धी पत्रकाद्वारे मागणी केले आहे.

Leave a Comment