प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना
जालना तालुक्यातील वखारी येथील शेतकरी रावसाहेब रंगनाथ खैरे यांचा पटावरचा बैल लंम्पी रोगामुळे मृत्यू झाला आहे.तसेच ग्रामीण भागामध्ये लंम्पी आजाराची साथ मोठ्या प्रमाणात पसरत असून या ठिकाणी वैद्यकीय अधिकार्याची व दवाखान्यांची कमतरता भासत आहे.तसेच काही जनावर दिवसेंदिवस लंम्पी रोगामुळे बिमार पडत आहे.त्यांचीही लवकरात लवकर वैद्यकीय उपचार पुरवावे व मदत करावी आणि लंम्पी लसीकरण करावे अशी व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी अपंगसेल तालुका अध्यक्ष लक्ष्मण राठोड,शिवाजी राठोड,विष्णू राठोड यांनी केली आहे.