रोहीनीताई खडसे यांच्या संवाद यात्रेतुन सुटला निमखेड ता बोदवड येथील विद्यार्थी व गावकरयांचा मोठा प्रश्न ..

0
260

 

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

निमखेड ता बोदवड येथील दररोज बोदवड येथे शिक्षणासाठी ४०/५० विद्यार्थी नियमित येत होते तरी त्यांना बोदवड येथे सकाळी शाळेत यायला बस येत नव्हती म्हणुन तेथील गावकरयांनी संवाद यात्रे दरम्यान रेहीणीताई खडसे खेवलकर यांच्या लक्षात विषय आनुण दिला तर ताईनी त्यात ताबडतोब लक्ष देऊन व पाठपुरावा करुण आज पासुन नियमित सकाळी ६.३० वाजता एक व दुसरी १०.१५ वाजता या वेळेत विद्यार्थी व गावकरयांना बसची सुविधा उपलब्ध करुन दिली त्यासाठी जळगाव जिल्हा युवक सरचिटणीस विजय चौघरी यांनी सुद्धा वेळोवेळी जाऊन पाठपुरावा केला म्हणुन गावकरयांनी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त केले ..तसेच बस .चालक व वाहक .यांचा शाल नारळ फुलांच्या माळा देऊन स्वागत केले उपस्थित सरपंच सुरंगे सर ,संतोषभाऊ पाटील व सर्व गा्रमपंचायत सदस्य विद्यार्थी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here