रेल्वे ब्रीजचे बांधकाम मालधक्क्यापर्यंत करा-मनसे

 

शैलेश राजनकर गोंदिया

आमगाव,दि.21ः- आमगाव रेल्वे स्टेशनमधील ओव्हर ब्रिजचे बांधकाम फलाट क्रमांक ५ पासून तर मालधक्क्यापर्यंत करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने स्टेशन मास्तर आमगावच्या वतीने डीआरएम नागपूर यांना पाठविण्यात आले आहे.
आमगाव बुकिंग कार्यालयापासून नव्याने ओव्हर ब्रिज चे बांधकाम सुरू आहे. फलाट क्रमांक १,२,३, वर ओव्हर ब्रिज बनलेला आहे. परंतु, फलाट क्रमांक ४ व ५ वर ओव्हर ब्रिज नाही. त्यामुळे त्या बाजूच्या प्रवाशांना व मालधक्क्यावरील कामगारांना रेल्वे रूळ ओलांडून तिकीट घेण्यासाठी यावे लागते. फलाट क्रमांक ५ च्या दक्षिण बाजूला असलेल्या बिरसी, कुंभारटोली, जामखरी, फुक्कीमेटा, तिगाव, पाऊलदौना, इत्यादी गावातील प्रवाशांना रेल्वे रूळ ओलांडून यावे लागत असल्याने अनेकदा मोठी अपघात घडले आहेत. व अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. करिता फलाट क्रमांक ५ पासून तिकीट बुकिंग कार्यालयापयर्ंत ओव्हर ब्रिज केल्यास सोईचे होईल, याकरिता मनसेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. यावेळी निवेदन देतांनी जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना गवली, बाळू वंजारी, नितेश मेर्शाम, विजय रहांगडाले, चंदन बावणे, राजू मेंढे, लक्ष्मण शेंडे, अर्षद भुरा, संजीव ठाकरे, शैलेश थेर, विकास टेभरे, अर्चित पारवे इत्यादी उपस्थित होते.

Leave a Comment