हिंगणघाट- नईम मलक
देखणे ते चेहरे
जे प्रांजळांचे आरसे !
गोरटे की सावळे
या मोल नाही फारसे !! या कविवर्य बा. भ.बोरकर यांच्या काव्य ओळी प्रमाणे जीवन जगणारे व तो आदर्श समाजा समोर ठेवणारे लोकनेते आमदार बच्चूभाऊ कडू यांचा जन्मदिवस येथील रुग्णमित्र गजू कुबडे यांनी दरवर्षी प्रमाणे
यंदाही बेवारस मनोरुग्णा सोबत साजरा करुन एक आगळा वेगळा पायंडा निर्माण केला आहे.
अनेक संतांनी सांगितलेले विचार प्रत्यक्षात आचरणात आणत त्या नुसार रंजल्या- गाजल्यांच्या जीवनात थोडे हास्य फुलविण्यासाठी शेतकरी नेते अपंगांचे कैवारी आमदार बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवसाचे निमित्त साधून येथील रुग्णमित्र गजू कुबडे या अवलियानेही बच्चूभाऊच्या जन्मदिनी स्वतःचे बॅनर पोष्टर न लावून कोणतीही जाहिरातबाजी न करता मनोरुग्णा सोबत संपूर्ण दिवस घालवून त्यांच्या असहाय जीवनात थोडे हास्य निर्माण करून संत तुकारामाच्या अभंगातील जे का रंजले गाजले,त्यासी म्हणे जो आपुले! ओळी सार्थ करण्याचा प्रयन्त केला.
जाम येथील चंद्रपूर रोड वरील मनोरुग्णासाठी प्रसिद्ध असलेले जाम येथील चावरा आश्रम येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे विदर्भ प्रमुख व वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख रुग्णमित्र- गजु कुबडे व सहकाऱ्यांनी ५४ मनोरुग्णा सोबत अनोख्या पद्धतीने साजरा केला.
संपूर्ण दिवस या ५० मनोरुग्णासोबत घालवून गजू कुबडे व त्यांच्या सहकारी यांनी एक वेगळाच आदर्श प्रस्थापित केला. यावेळी आश्रम येथील सर्व मनोरुग्णाना नवीन कपडे वाटप करण्यात आले.व या मनोरुग्णाना सन्मानाने ताट-वाटीने
पंगत करून जेवणाच्या कार्यक्रम करण्यात आले. यावेळी मनोरुणाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसून आली.
या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे राजेशभाऊ बोभाटे (उपजिल्हाप्रमुख )शहर प्रमुख अतुल जाधव,अजय खेडेकर (उपसरपंच जाम ग्रा.प.),राहुलभाऊ पाटील, माजी शहर प्रमुख अजय लढी,विष्णू घरत (माजी तालुका प्रमुख समुद्रपूर), सुरज कुबडे,अमितभाऊ गोजे, सतिषभाऊ गलांडे,अजयभाऊ ठाकरे,खोमलाल जगराह (माजी ग्रा.प सदस्य नंदोरी)रविभाऊ धोटे,अनंता वायसे दिपकभाऊ पावडे (शाखा प्रमुख सावली वाघ),राहुल चौधरी (शाखा प्रमुख गोविंदपूर),सौरभ धोबे,तुषार उरकांदे,रितेश गुडधे,प्रकाश मनने,अमोल वाघमारे,करण विटाळे,सागर रोशन बरबटकर,सुनील जगताप,प्रवीण बोरूटकर,जगदीश धुरने,नाना नागाठाणे व फादर वर्गीस इत्यादी उपस्थित होते