रियाची घरी NCB, सर्च ऑपरेशन सुरु, मिरांडाला घेतले ताब्यात

 

मुंबई, सुशांत सिंह राजपूत प्रकरणी ड्रग्ज कनेक्शन असल्याचं समोर आल्यानंतर आता रिया-शोविक आणि सॅम्युल मिरांडा समोरच्या अडचणी वाढल्या आहेत. शोविक आणि रियाचे ड्रग्ज विषयी चॅट समोर आल्यानंतर नार्कोटिक्स विभागाची एका टीमनं रियाच्या घरी शुक्रवारी सकाळी छापा टाकला आहे. तर दुसरी टीम सॅम्युल मिरांडाच्या घरी दाखल झाली असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.

सॅम्युल मिरांडाविरोधात NCB टीमकडे पुरावे असल्यानं त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तर रिया आणि शोविकला अटक होणार का? हे पाहाणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या दोन्ही ठिकाणी NCBकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे.

Leave a Comment