(तुकाराम राठोड/जालना)
जालना-राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाची राज्य कार्यकारिणी ची सभा तुळजापूर येथे दिनांक 27 रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत वीर तपस्वी मठ सरकारी दवाखान्यासमोर लातुर रोड तुळजापूर येथे संपन्न होणार आहे.या सभेमध्ये ओबीसी कर्मचारी अधिकारी तसेच विध्यार्थी व युवा यांच्या समस्या व अडचणी संदर्भात विचारमंथन करण्यात येणार आहे.संघटनेचे भव्य राज्य अधिवेशन येत्या काळात होणार असल्याने त्याची पूर्वतयारी या सभेमध्ये होणार असल्याचे राज्य सरचिटणीस अनिल नाचपल्ले यांनी सांगितले.या सभेला सर्व राज्य पदाधिकारी,विभागीय पदाधिकारी,जिल्हा पदाधिकारी तसेच सर्व ओबीसी कर्मचारी अधिकारी प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.राज्याध्यक्ष शाम लेडे,राज्य कार्याध्यक्ष संतोष डोंगरखोस,राज्य उपाध्यक्ष सुखदेव भालेकर,राज्य कोषाध्यक्ष संजय मंगे,राज्य कार्यालयीन सचिव प्रसाद फर्डे,राज्य समन्वयक विजयकुमार पिनाटे,विभागीय अध्यक्ष मराठवाडा लक्ष्मण दावनकर,कार्याध्यक्ष सुहास दराडे,कोकण विभाग अध्यक्ष अरुण मडके,पुणे विभाग अध्यक्ष प्रभाकर कळमकर,नागपूर विभाग अध्यक्ष राजू बोचरे,आदींसह सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाची भविष्यातील वाटचाल आणि ओबीसी समाजाला नोकरीतील पदोन्नती,नोकरभरती मधील अनुशेष,नॉनक्रिमीलेयरची मर्यादा वाढवून घेणे,सारथी प्रमाणेच महाजोतीने विविध प्रकारच्या योजना विद्यार्थ्यांसाठी राबविणे,परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत इत्यादी विविध प्रश्नांवर चर्चा करून,येत्या दोन महिन्यांत शेगाव जिल्हा बुलढाणा येथे मंत्री महोदय,राज्यातील ओबीसी खासदार,आमदार,जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य अधिवेशन घेणे या बाबींवर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.सदर राज्य स्तरीय बैठकीचे उद्घाटक म्हणून उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्री.विलासजी जाधव साहेब हे उपस्थित राहणार आहेत.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य ऍडव्होकेट सन्माननीय श्री.बी.एल.सगर(किल्लारी कर)यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.सदर बैठकीसाठी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांनी उपस्थित रहावे.असे आवाहन जिल्हा अध्यक्ष संतोष भोजने,जिल्हाकार्याध्यक्ष दिपक हजारे,जिल्हा सरचिटणीस पुरुषोत्तम म्हेत्रे,कळंब तालुका अध्यक्ष अशोक शिंपले,वाशी तालुका अध्यक्ष सखाराम शिंदे,भुम तालुका अध्यक्ष बाळासाहेब कांबळे,परांडा तालुका अध्यक्ष तानाजी तरंगे,उमरगा तालुका अध्यक्ष परमेश्वर साखरे,लोहारा तालुका मच्छिंद्र बोकडे,अध्यक्ष तुळजापूर तालुका अध्यक्ष बालाजी माळी यांनी आव्हान केले आहे.