राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा देशातील ज्येष्ठ नेते मा.श्री शरद पवार जी यांच्या घरावरील षडयंत्रकारी भ्याड हल्ल्या च्या विरोधात गोंदिया येथे गांधी प्रतिमा चौकात निषेध निदर्शने करण्यात आली. यावेळी खासदार मा.श्री प्रफुल पटेल यांचा निर्देशानुसार व माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.
काल शेकडोच्या संख्येने एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.श्री शरदचंद्र पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानात घुसून आंदोलन कर्त्यानी श्री मा.शरदचंद्र पवारांच्या घरावर चप्पल आणि दगडफेक करण्यात आली. उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले होते. तसेच, कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युएटी देण्यासह त्यांच्यावर कारवाई न करण्याची सूचना एस टी महामंडळाला केली होती. पण, तरीही पुन्हा एस टी कर्मचारी आक्रमक झाले. शेकडोच्या संख्येने एसटी कर्मचारी शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानात घुसले आणि घोषणाबाजी केली. हा न्यायालयाचा अवमान असून ज्येष्ठ नेते मा.श्री शरद पवार यांच्या विरोधातील षडयंत्र आहे. देशातील ज्येष्ठ व जनसेवेसाठी झटत आलेल्या नेत्याच्या घरावर असा भ्याड हल्ला करणे हे पुरोगामी व सामाजिक सुधारकांचा वारसा जपणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील ही अशोभनीय घटना असून अशा घटनांचा व षडयंत्रकारी प्रवृत्ती चा तीव्र निषेध करण्यात येत असल्याचे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी म्हटले.
या वेळी सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, माजी खासदार खुशाल बोपचे, देवेंद्रनाथ चौबे, नरेश माहेश्वरी, विनोद हरिणखेडे, प्रभाकर दोनोडे, केतन तुरकर, रफिक खान, योगेंद्र भगत, अशोक सहारे, बाळकृष्ण पटले, कुंदन कटारे, कमलबापू बहेकार, सी. के. बिसेन, अविनाश काशिवार, केवल बघेले, रविकांत बोपचे, तेजराम मळावी, सौ. वंदना डोंगरवार, गोपाल तिवारी, विष्णू शर्मा, किरण पारधी, सतीश देशमुख, विनित सहारे, हेमंत पंधरे, सुनील भालेराव, राजेश कापसे, नानू मुदलीयार, चुन्नीभाऊ बेंद्रे, राजू एन जैन, कैलास पटले, सुरेश हर्षे, डॉ संदीप मेश्राम, खालिद पठाण, भगत थकरानी, सौ. सुमन बिसेन, सौ. रजनी गौतम, अखिलेश शेठ, बाळा हलमारे, रवी पटले, सौ. दीक्षा भगत, सौ. रिता लांजेवार, दिलीप गभणे, धनवंत कोवे, मयूर दरबार, दिनेश अग्रवाल, मामा बन्सोड, नीरज उपवंशी, नितीन टेंभरे, इकबाल सय्यद, वाय टी कटरे, शंकरलाल टेभरें, गंगाराम बावनकर, प्रेम जैस्वाल, उमेंद्र भेलावे, लिंकेश चिखलोंडे, सौ. परबता चांदेवार, सौ. शर्मिला टेम्भूर्णीकर, सौ. उषा मेश्राम , नरेश भेंडारकर, चंद्रकुमार चुटे, एकनाथ वहिले, सौरभ रोकडे, विनायक खैरे, करण टेकाम, विनायक शर्मा, सोनल मेश्राम, सुनील पटले, शैलेश वासनिक, योगी येडे, लव माटे, दर्पण वानखेडे, रमण उके, जिम्मी गुप्ता, रमाकांत जैस्वाल, कालू चौहान, शिवलाल नेवारे, शौरभ जैस्वाल, सोमेश राहंगडाले आकाश नागपुरे, पंकज चौधरी , मदन चिखलोंडे, राजेश तुरकर, नागेंद्रनाथ चौबे, पावन धावडे, प्रमोद कोसरकर, रमेश कुरील, कपिल बावनथडे, कुणाल बावनथडे, नत्थू भाटिया, अनिल टेकाम, हर्षवर्धन मेश्राम, पुष्पलता माने, संदीप पटले, महेश करियार, राजेश दवे, शरभ मिश्रा, नागरत्न बन्सोड, सुरेंद्र रहांगडाले, नागो बन्सोड, रमेश गौतम, शब्बीर कुरेशी, वामन गेडाम, राजू येडे, चुन्नीलाल शहारे, गोविंद लिचडे, हितेश फतेह, प्रतीक पारधी, अमित अवस्थी, विजय भेंडारकर, प्रकाश बरैय्या, प्रेमलाल बरैय्या, भागवत झिंगरे, राहुल यावलकर, प्रशांत मेश्राम, सुरेंद्र नागपुरे, दिलीप डोंगरे, पंकज महादुळे, हेमराज डहाके, सतीश पारधी, प्रदीप ठवरे, लव्हली होरा, सुखराम वाढइ, कापगते जी, पियुष झा, संतोष लिल्हारे, सौरभ गौतम, अविनाश महावत, विक्की भाकरे, अहमद भाई, प्रवीण बैस, महेश रंगारी, कान्हा बघेलेयांचा सह सर्व तालुका अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगर परिषद सदस्य, नगर पंचायत अध्यक्ष व सदस्य, प्रमुख पदाधिकारी, सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधीकारी, कार्यकर्ता व नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते .