रामनगर-जैतापूर,बाजीउम्रद-तलाव सावंगी,मानेगाव-लालदेव फाटा रस्त्यांची दुरावस्था,तिन्ही रस्त्यांना तात्काळ मंजूरी देण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री Ravsaheb Danve यांना साकडे

 

Jalna जालना:(प्रतिनिधी)-तालुक्यातील रामनगर परिसरात असलेल्या रामनगर ते जैतापूर फाटा 13 कि.मी,बाजीउम्रद-तलाव सावंगी 10 किमी.आणि मानेगाव (जा) ते लालदेव फाटा 3 कि.मी रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून,या तिन्ही रस्त्यांच्या कामांना मंजूरी देवून तात्काळ नव्याने डांबरीकरण करण्यात यावे.

,अशी मागणी भाजपा ग्रामीण,भाजपा तालुका युवा मोर्चासह ग्रामस्थांनी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव दानवे यांच्या मार्फत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे(Ravsaheb Danve Patil )यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

आहे.यानिवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की,जालना तालुक्यातील रामनगर ते जैतापूर फाटा 13 कि. मी रस्ता,बाजीम्रद ते तलाव सावंगी फाटा 10 कि.मी रस्ता तर मानेगाव (जा) ते लालदेव फाटा या तिन्ही मार्गांवरील रस्ते पूर्णतः खड्‌ड्यात गेले असून,दळण – वळणासाठी या रस्त्याव्यतिरिक्त पर्यायी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांसह कष्टकरी वर्गाच्या विकासाला खोडा बसत आहे, रामनगर ते जैतापूर फाटा या दरम्यान मौजपुरी, भिलपुरी,निरखेडा,मानेगाव (खा), मानेगाव(जा),गणेशपूर यासह मोतीगव्हाण, दहिफळ, तलाव सावंगी,जैतापूर,अंतरवाला,पाहेगाव आदी 30 ते 35 गावांचा संपर्क येतो.तर बाजीउम्रद – तलाव सावंगी फाटा मराठवाडा – विदर्भ सीमा जोडणारा रस्ता आहे.आणि मानेगाव (जा) ते लालदेव फाटा रस्ता या भागातील शेतकऱ्यांना दळण – वळणासाठी एकमेव रस्ता असून, या रस्त्यावर मोठ-मोठाले खड्डे पडले आहेत तर या रस्तावरील पुल पूर्णतः खचल्याने या रात्री – उपरात्री शेतात ये – जा करणे जिकिरीचे झाले आहे.जालना हे जिल्हा व तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचा तालुक्याशी दररोजचा संपर्क येत असून,शेतकऱ्यांनासह, व्यापारी,दुकानदार,शालेय विद्यार्थी आदिनां वरील तिन्ही रस्तावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो.खड्डे चुकविण्याच्या नादात दररोजच किरकोळ अपघात होत.

असून,महिला,प्रवाशी, रुग्ण यांना हि मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या भागातील ग्रामस्थांना रात्री – अपरात्री गरज पडल्यास वाहनचालक टाळाटाळ करतात. कारण रस्तावरील खड्‌ड्यामुळे वाहने नादुरुस्त होत आहेत.या तिन्ही रस्त्यांची ऐकून परिस्थिती पाहिल्यास या खराब रस्तामुळे या भागाच्या विकासालाच खोडा बसला असून रामनगर ते परेगाव फाटा, बाजीउम्रद ते तलावसावंगी फाटा आणि मानेगाव (जा) ते लालदेव फाटा या तिन्ही रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी नव्याने डांबरीकरण करण्यात यावे.

, अशी मागणी करण्यात आली.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष वसंतराव शिंदे,जिल्हा उपाध्यक्ष पांडूरग पोहेकर,भाजयुमो तालुकाध्यक्ष संजय डोंगरे,भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष परसराम तळेकर,नारायण मोहिते,नारायण जाधव,तुकाराम राठोड,बी.एस.शेळके,सतीश हांडे,दौलतराव भुतेकर,दत्ता जाधव,विष्णू गुळवे,नारायण वाघचोरे,गोरक्षणाथ गायकवाड,राजेश कुरलीय यांच्यासह बाजीउम्रद,भिलपुरी,मानेगाव (खा),मानेगाव(जा),गणेशपूर,दहिफळ,मोतीगव्हाण,पाहेगाव,तलाव सावंगी,अंतरवाला आदी गावांमधील ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Leave a Comment