रान डुकरांनी केला मका पीक फस्त !
शेतकरी अडचणीत वनविभागाचे साफ दुर्लक्ष!
येथील शेतकरी रामदास अस्वार यांच्या शेतातील मका पिकाचे वन प्राणी रानडुकरनी मोठया प्रमाणात नुकसान केले असता शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे
संग्रामपूर तालुक्यात गत वर्षी कापूस पिकांवर बोडअळी या रोगाने थयमान घातले असता शेतकऱ्यांनी या वर्षी हंगामी सोयाबीन बरोबर मका पिकाची लागवळ देखील मोठया प्रमाणात केली असनु सद्या या पीकाचे कणसे चांगल्या प्रकारे भरण्यास सुरवात झाली असून शेतकरी मोठया आनंदात असल्याने मात्र पीक येण्या आधीच वन्य प्राणी रानडुकरे यांनी सदर पीक फस्त करून टाकले आहे या परिसरात वन्य जीव प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर संख्या असून सबंधित वन्य जीव विभाग या कळे साफ दुर्लक्ष करत असल्याने शेतकरी संकताट सापळत आहेत सदर शेतकरी अस्वार हे अल्प भूधारक असून त्यांच्या कळे एक एक्कर एवढीच शेती ही वरवट बकाल शेत शिवारातील गट नंबर ६९१ आहे त्यावर त्याच्या परिवाराचे उद्धार निवारण करीत असून मात्र त्यांच्या शेतातील मका पिकाचे पीक हे वन्य प्राणी रानडुकरे यांनी फस्त केले असल्याने मोठया प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्याने वन्य जीव विभागा कळे या बाबत तक्रार देखील दाखल केली आहे मात्र।अद्यापही शेतकऱ्यांला कुठलीही आर्थिक मदत व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामा करण्यासाठी सबंधित वन्य जीव विभागा कळून करण्यात आला नाही