(तुकाराम राठोड/जालना)
जालना राज्यातील भटके विमुक्त आघाडी च्या लोकांना न्याय देण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करून योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांनी जालना येथे भटके विमुक्त आघाडी च्या बैठकीत मार्गदर्शन करताना केले.यावेळी बैठकीचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे तर प्रमुख अतिथी म्हणून सरचिटणीस अशोक चोरमले, गोविंदराव गुंजाळ कर,महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा डॉ उज्वला हाके,मराठवाडा अध्यक्ष बंडू खांडेकर,डॉ उज्वला दहिफळे,शहर अध्यक्ष राजेश राऊत,संध्या देठे-महिला पृदेश उपाध्यक्ष,भटके विमुक्त आघाडी जालना जिल्हा अध्यक्ष डॉ रमेश तारगे,पवन झुगें,तुकाराम राठोड आदी उपस्थित होते.यावेळी आपल्या भाषणात पवार म्हणाले की,राज्यातील भटक्या समाजातील लोकांची अवस्था फार वाईट असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.मोठ्या प्रमाणावर घरकुलाचे प्रश्न आहेत.अनेक भटके लोक पालाच्या घरात राहतात.त्यांच्या साठी निधी उपलब्ध करावा लागणार आहे.आपण शासन दरबारी पाठपुरावा करुच परंतु कार्यकर्ते मंडळी ना ताकद देण्याची गरज आहे.ती ताकद जिल्हा अध्यक्ष आमदार संतोष दानवे देतील अशी अपेक्षा व्यक्त केली.धन्यवाद मोदीजी अभियान चे पोस्ट कार्ड लाभार्थ्यांच्या मार्फत पाठवले जातील.यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले. अध्यक्षीय भाषणात आमदार संतोष दानवे यांनी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी जालना जिल्ह्यात याआधी केलेल्या कामाचा आवर्जून उल्लेख केला. त्यामध्ये पाचशे सामुदायिक विवाह सोहळा,दुष्काळी परिस्थिती मध्ये खोलीकरणाची कामे या सारखे खुप मोठे काम त्यांनी केले.सातत्याने काम करत असताना राज्यात मोठ्या प्रमाणावर संघटन उभे केले आहे. यावेळी सरचिटणीस अशोक चोरमले यांनी कामांचा आढावा घेतला.भविष्यात कामासाठी सुचना केल्या,यावेळी गोविंदराव गुंजाळ कर,महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा उज्वला हाके,डॉ.उज्वला दहिफळे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष डॉ.रमेश तारगे यांनी करताना सांगितले की,धन्यवाद मोदीजी अभियान चे एक हजार पोस्ट कार्ड भटके विमुक्त आघाडी च्या वतीने पाठवण्यात येतील असे आश्वासीत केले.यावेळी काही पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठवाडा अध्यक्ष बंडू खांडेकर यांनी केले तर आभारप्रदर्शन उद्धव जायभाये यांनी मानले.