सिंदखेडराजा सुरेश हुसे
सिंदखेडराजा तालुक्यातील बहुचर्चित राजेगाव येथील ‘यशवंतराव चव्हाण माध्यमिक व स्व .भास्करराव शिंगणे उच्च माध्यमिक विद्यालय येथील शिक्षक गजानन संपतराव खंडारे यांनी विद्यालयाच्या संदर्भातील विविध मागण्यासाठी शिक्षण उपसंचालक अमरावती येथे दिनांक १८ ऑक्टोंबर पासून संपूर्ण परिवारासह साखळी उपोषणास सुरुवात,
त्यांनी पुढील मागण्या संदर्भामध्ये साठी उपोषण सुरू केले आहे यामध्ये
शिक्षक भरती प्रकरणी प्राचार्य विकास सरकटे यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर ४२० प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करावा .शासनाला वारंवार फसंविणाऱ्या तोतया संस्था अध्यक्ष /सचिव सूर्यकांत हिम्मतराव पवार याचेवर ४२० फौजदारी दाखल करणे,
नियम बाह्य शिक्षक भरती प्रकरणी प्राचार्य व संस्था अध्यक्ष यांना अभय दिल्या प्रकरणी बुलढाणा शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद श्री प्रकाश मुकुंद यांना निलंबित करण्याबाबत ‘
आधी विविध मागण्यासाठी गजानन खंडारे यांचे अमरावती येथे कुटुंबासह उपोषण सुरू आहे,@buldhana #buldhana