राजकीय गुन्हेगारीला अटकाव घालणे आवश्यक अमरावतीत अतिरिक्त ठाणे व सीसीटीव्ही ची मागणी

 

उषा पानसरे मू.का. सपादच मो. 9921400542 अमरावती

गृहविभागाच्या मागण्यांवर विधानसभेत आ. सौ. सुलभाताई खोडके यांची चर्चा*.

मुंबई ८ मार्च : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या मंगळवारच्या सत्रामध्ये सभागृहात राज्याच्या गृहविभागाच्या विषयांवरील पुरवणी मागणींवर चर्चा घडवून आली . या चर्चेमध्ये अमरावतीच्या आ. सौ . सुलभाताई खोडके यांची सहभागी घेतला . अमरावती मतदार संघात निवडणुकीच्या काळात राजकीय गुन्हेगार सक्रिय राहत असून नेत्यांच्या राजकीय संरक्षणाने ते मोकाट फिरत आहे. दरम्यान मागील विधानसभा निवडणुकीच्या काळात गुन्हेगारी प्रवृतींद्वारा आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केल्या गेला . कार्यकर्त्यांना धमक्या देऊन त्यांची अडवणूक केल्या गेली . अशा परिस्थितीत आपण निवडणूक जिंकली .आगामी मनपा निवडणूक काळात सुद्धा हे राजकीय गुन्हेगार सक्रिय राहून शांतता व्यवस्थेला धोका निर्माण करण्याची शक्यता आहे. याला नेत्यांचे संरक्षण असल्याने ते मोकाट फिरत आहेत . शहरातील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राजकीय गुन्हेगारांच्या घरी धाडी टाकल्या असता , त्यांच्या घरातून बंदूक सारखे घातक शस्त्र साठे आढळून आले, या कुणालाही अटक झाली नाही , उलट बेल मिळाली अशी परिसथितीच अमरावतीत वातावरण आहे, हि बाब फार गंभीर आहे. याची चौकशी करून राजकीय गुन्हेगारावर कारवाईची मागणी आ. सुलभाताई खोडके यांनी सभागृहात केली . शहरात . त्यामुळे अशा राजकीय गुन्हेगारावर अंकुश लावण्याकरिता गृह विभागाने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी सभागृहात गृहविभागाच्या विषयांवर चर्चा करतांना स्पष्ट केले . अमरावती मध्ये वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी व वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर सद्याचे पोलीस ठाणे कमी पडत आहे. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा म्हणून अमरावती मध्ये अतिरिक्त पोलीस ठाणे स्थापन करण्याची गरज व पोलिसांचे अधिक मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे., असे सांगीत शहर सुरक्षेच्या दृष्टीने विविध भागात सीसीटीवी कॅमेरे बंसविण्यात यावे , अशी मागणी करीत आमदार महोदयांनी सभागृहाचे लक्ष वेधले . यासाठी आपण गृह विभागाकडे प्रस्ताव दिला असून यावर त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली . गेल्या नोव्हेंबर २०२१ मध्ये अमरावती मध्ये दंगल सदृश परिस्थिती उद्भवली असता अमरावती पोलिसांनी चोख भूमिका घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली . त्याबद्दल अमरावती पोलीस व गृह विभागाचे अभिनंदन सुद्धा आ. सुलभाताई खोडके यांच्या वतीने अधिवेशना दरम्यान बोलतांना करण्यात आले. .. दरम्यान अमरावती शहरातील पोलीस विभागाच्या अनेक बाबींविषयी सभागृहाला अवगत करतांना पोलीस वसाहतींचा प्रश्न निकाली काढण्यात यावा. मागील ३०ते ३५ वर्षांपासून पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न निर्माण झाला गृह विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आली . दरम्यान अधिवेशनात गृह विभागाच्या कोरोना संकट काळात चोख भूमिका तसेच रस्त्यावर तैनात राहून योध्यांप्रमाणे काम करणाऱ्या पोलीस शिपायांना शिपायांना पदोन्नती देण्याचा शासनाचा निर्णय निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगून आमदार महोदयांनी सरकारचे अभिनंदन केले. महिला अत्याचार रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने शक्ती कायदा पारित केला याबद्दल सुद्धा आमदार महोदयांनी आभार मानीत अभिनंदन केले आहे.
न्यूज रिपोर्टर उषा पानसरे असदपूर

Leave a Comment