राजकीय कुतुहल अन् माणुसपण जपणारी ग्रेट भेट!!!

 

मा.मंत्री तथा विद्यमान आ.डाॕ.राजेंद्रजी शिंगणे यांची मा.जि.प.उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांचे घरी सदिच्छा भेट!

राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करतांना मतभेद-मनभेद वाढत असतांना राजकीय कुतुहल निर्माण करणारी सदिच्छा भेट निर्माण करणारी ठरली.

राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नेते मा.मंत्री तथा सिंदखेड राजा चे विद्यमान आमदार डाॕ.श्री.राजेंद्रजी शिंगणे यांनी बुलढाणा जि.प.चे मा.उपाध्यक्ष संगितराव भोंगळ उपाख्य राजु पाटील यांचे पातुर्डा येथे सदिच्छा भेट दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २ गटात विभागल्या गेल्याने राजकीय समिकरणे बदलणार अशी चर्चा होत असतांना राजकारणा व्यतिरिक्त ‘माणुसपण’ जपणारा जिव्हाळा दोन्ही राजकीय नेतृत्वांच्या माणसातुन आपलेपणा रुजविल्या गेला हे विशेष उल्लेखनीय म्हणावे लागेल…!

 

आ.डाॕ.श्री.राजेंद्रजी शिंगणे हे सद्या ‘अजितदादा गटात’ तर संगितराव भोंगळ हे ‘शरद पवार गटात’ आहेत पक्ष एक विचारधारा ऐकचं त्यात निर्माण झाली राजकीय फडी असतांना “शिंगणे-भोंगळ” यांची ग्रेट भेट कुतुहल निर्माण करत आहे…!!!
असो, राजकीय प्रतिकुलता असतांना माणुसपण जपणारी ‘अनुकुलता’ रुजविणारी उपरोक्त ग्रेट असल्याचे स्पष्ट होत आहे. कारण दोन्ही नेते आप-आपल्या पक्षाच्या नेतृत्वाशी प्रामाणिक आहेत त्यात पक्षीय विचारधारेशी बांधिल आहेत राजकारणातुन समाजकारण जपण्यासाठी ही ‘ग्रेट -भेट’विचारांनी प्रग्लभता दाखवुन देते हे विशेष!

असो, आज ‘अजितदादा गट’ राष्ट्रवादी काँग्रेस चे मा.मंत्री सिंदखेड राजा चे विद्यमान आ.डाॕ.श्री.राजेंद्रजी शिंगणे यांनी संगितराव भोंगळ यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. संगितरावांच्या मातोश्रींची संवाद साधला त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपुस केली. संगितरावांची विविध विषयांवर संवाद साधला चर्चा केली.

यावेळी टी.डी. अंभोरे साहेब,देवेंद्रदादा देशमुख, भगवान लाऊडकर, नारायण ढगे, संदीप दामधर, नरेश घिवे, पंजाबराव वानखडे, पप्पू पठाण,दुर्गासिंग सोळंके, विष्णू भोंगळ,ज्ञानेश्वर बोपले,विलास मानकर सरपंच,प्रवीण पाचडे, अमोल व्यवहारे,अमित पाटील,मुन्ना पिसे,निखिल भाकरे,मंगेश पानबिहाडे, उज्वल पाटील,विक्रांत पाटील,उत्तम हातेकर उपस्थित होते.

Leave a Comment