मा.आमदार विजयराज शिंदे यांची केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना.नितिनजी गडकरी यांच्या कड़े प्रत्यक्ष भेटून मागणी.
अजहर शाह मोताळा प्रतिनिधी
अजिंठा-बुलडाणा-बैतूल सह सर्वच भागात राष्ट्रीय महामार्गाच्या कामात सुरक्षिततेच्या विविध उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
या बाबत आपल्या सूचना व मागण्यासाठी आज दि.8 /11/2020 रोजी ना.नितिनजी गडकरी यांची सदिच्छा भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद आहे की,
अजिंठा-बुलडाणा-बैतूल या
महत्वाच्या व महत्वाकांक्षी असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दोन ते तीन वर्षभरापासून सुरु आहे.रस्त्याची लांबी रूंदी अत्यंत जास्त असल्याने या महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात खोलवर खोदकाम झालेले आहे.वाहतुकीच्या दृष्टिने एक बाजू वाहनांच्या वाहतुकीसाठी तर दूसरीबाजू ने खोलवर खोदकाम सुरु आहे सदर खोदकामामुळे वाहतूकची कोंडी होत आहे तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे व अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहे.
संबंधीत कंत्राटदार यांनी जीवितहानी व अपघाताच्या दृष्टिने आवश्यक असणाऱ्या सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना मार्गाच्या कामात केलेल्या दिसून येत नाही. खोदकामाच्या कड़े लगत कोणतेही रेडियम लावलेली baaricades लावल्यात आलेले नसल्याने वाहने सरळ रस्ताच्या खाली खोलवर जाऊन पलटी होऊन भीषण अपघाताच्या घटना घडत आहे. अश्या रात्री अपरात्री झालेल्या अपघातातिल ज़ख्मीना साधी प्राथमिक उपचार सुद्धा मिळत नाही. जख्मी व त्यांची अस्ताव्यस्त स्थितीतील वाहने खोल खोदकामात पडल्यास रात्री दृष्टिक्षेपास न आल्याने लवकर उचलली सुद्धा जात नाही.खोदकाम ची लांबी ऊंची बरीच असल्याने होणारा अपघात हा भयावह असतो. अनेक ठिकाणी पुलांची कामे सुरु आहेत अश्या वळण रस्त्याच्या ठिकाणी (Divertion) रेडियमचे सुस्पष्ठ दिशादर्शक नसल्याने अशी ठिकाणे अपघातास निमंत्रण देणारी ठरत आहे. संबंधित कंत्राटदार यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही उपाययोजना प्रगती पथातिल महामार्गात केलेल्या दिसून येत नाही.सदर महामार्गाच्या कामांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून त्या दृष्टिने सुरक्षिततेच्या उपाययोजना
करणे आवश्यक ठरले आहे.अनेक ठिकाणी कंत्राटदारांच्या चुकीच्या कार्य पद्धतिमुळे वाहतूक ठप्प होऊन तासनतास वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. बुलडाणा जिल्ह्यासह इतरही राष्ट्रीय महामार्गाच्या प्रगती पथा असलेल्या कामात पुढील उपाययोजना करणे गरजेचे आहे.
1)संबधित कंत्राटदार यांचे दर 25 कि.मि.आपातकालीन सेवा देणारे “हेल्पलाइन सेंटर” असावे सदर हेल्पलाइन सेंटरचे दूरध्वनी क्रमांक मार्गात ठिकठिकाणी ठळक अक्षरात नोंदवावे.
2) दर 25 कि.मि. अंतरावरील हेल्पलाइन सेंटर द्वारे एका रुग्णवाहीकेची विशेष सेवा उपलब्ध करून दयावी जेणेकरून जख्मी ना तातडीने आरोग्य सेवा पुरविता येईल व रुग्णालयात पर्यत नेता येईल.
3)खोदकामाच्या कड़े लागत रेडियम लावलेली barricades असावे जेणेकरून दिवसा व रात्री वाहणे खाली उतरून अपघात होनार नाही.
4)महामार्गाच्या कामात कंत्राटदार यांच्या चुकीच्या कार्य पद्धतिमुळे किंवा सुरक्षिततेचे उपाय न योजल्यास अपघात घडून मृत्यु गेलेल्यांच्या वारसास 50 लाख रु चे विमा संरक्षण देण्याची सक्ति कंत्राटदार यांना करावी.जेने करून रास्तकंत्राटदार सुरक्षिततेच्या उपाययोजना काळजीने करतील.
5) मुळ रस्त्यापासून नवीन होण्याऱ्या महामार्गाच्या कामाची ऊंची खुप जास्त असल्याने या कामांमुळे रस्त्यालगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी खुप त्रास होत आहे.शेतात बैलगाड़ी व वाहने जाऊ शक़त नाही .त्यामुळे शेत रस्त्याची योग्य व्यवस्था करावी.
6)पुल व वळण रस्त्याच्या ठिकाणी सुस्पष्ठ रेडियम लावलेली दिशादर्शक आवश्यक त्या ठिकाणी असावी.
अश्या प्रकारच्या सूचना व मागणी निवेदनात नमूद आहे.