मुख्य संपादक
अनिलसिंग चव्हाण
मुंबई:- भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर आज हवाई दलाच्या अंबाला येथील तळावर पाच रफाल विमाने भारतीय सैन्यदलांत अधिकृतरित्या सामील केली जात आहेत या कार्यक्रमास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, एअर चीफ मार्शल आर.के. भदोरिया यांनीही हजेरी लावली आहे हवाई दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “या कार्यक्रमादरम्यान राफेल विमानाचे औपचारिक अनावरण केले जाईल. त्यानंतर ‘सर्व धर्म पूजा’ केल्यावर रफाल आणि तेजस परिक्रमा करतील रफाल हे दोन इंजिन असलेलं अनेक कामं करू शकणारं मध्यम आकाराचं लढाऊ विमान आहे. हवेतून मारा करणं, हवेतल्या हवेत इंधन भरणं, अण्वस्त्राचा हल्ला झाल्यावर संरक्षण, लक्ष्याच्या हालचाली टिपणं त्यांच्यावर अचूक मारा करण्याची क्षमता ही राफेलची वैशिष्ट्यं आहे