येत्या 2 नोव्हेंबर ला सत्याग्रह शेतकरी संघटनेचा अकाल मोर्चा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे केले आवाहन= गणेश सडत कार

 

 

शेगाव=जळगाव जामोद संग्रामपूर शेगाव तालुक्यात बहरत असलेल्या पीक परतीच्या पावसाने मूग उडीद मका सोयाबीन हा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला तिन्ही तालुक्यात मुंग उडीद मक्का सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यात शासन दप्तरी आनेवारी 70 टक्के ची नोंद असल्याने वस्तुनिष्ठ सुधारित आणेवारी जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना हेक्‍टरी 30.000 रू करण्यात यावी करिता येत्या 2 नोव्हेंबर सोमवार रोजी युवा नेते शेख आयाज यांच्या नेतृत्वात सत्याग्रह शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन सह अकाल मोर्चाचे आयोजन शेगाव येथील तहसील कार्यालयावर केली आहे प्रमुख मागण्या. ओला दुष्काळ जाहीर करा. वस्तुस्थिती प्रमाणे 30 पैशाच्या आत आणेवारी जाहीर करा. पीक विम्याचा पूर्ण मोबदला द्या. दुष्काळी अनुदान किमान हेक्टरी 30 हजार विनाअट सरसकट द्या. कोरोना काळातील विद्युत बिल रद्द करा. सीसीआयची कापूस खरेदीव नाफेडची मका ज्वारी सोयाबीन खरेदी तात्काळ सुरू करा या मागण्यांसह येत्या सोमवारी अकाल मोर्चाचे आयोजन केले आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सत्याग्रह शेतकरी संघटना युवा आघाडी गणेश सडत कार यांनी केले

Leave a Comment