यावल शहर मोठ्या मारोती व धनगरवाडा परिसरातील गटारीचे ढाफे रस्ते काँक्रीटी करावे भाजपाची मागणी

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील धनगरवाडा परिसरातील काही ठीकाणी अद्याप प्रशासनाच्या वतीने रस्ते कॉंक्रटीकरणाचे झाले नसल्याने या परिसरात राहणाऱ्या नागरीकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असुन, यासंदर्भात प्रशासनाने तात्काळ योग्य ते पाउल उचलुन रस्ते काँक्रटीकरण करावे अशा मागणीचे लिखित निवेदन मुख्यधिकारी यांना भारतीय जनता पक्षाच्या वसुले गल्ली शाखा अध्यक्ष ललीत परमार्थी यांनी केली आहे . या संदर्भात लतीत परमार्थी यांनी मुख्यधिकारी मनोज म्हसे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , यावल नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील ठेंगे सोसायटी ते धनगरवाडा उर्वरीत भाग व धनगरवाडयातुन मोठया मारोती कडे जाणारा रस्ता हा बऱ्याच वर्षांपासुन रस्ता काँन्क्रीटीकरण आणि गटारीवरील ढाप्याचे अद्याप झाले नसल्याने या मार्गावरून ये जा करणाऱ्या पादचारी व नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे . या विषयी परिसरातील रहिवाशी नागरीकांनी या समस्या संदर्भात वारंवार तक्रारी करण्यात आल्या असुन देखिल नागरीकांशी निगडीत प्रश्नाकडे प्रशासन गांर्भीयांने लक्ष देत नसुन , रस्ते नसल्याने व गटारींवर ढापे नसल्याकारणाने लहान मुले या गटारीत पडत असुन, मोटरसायकल व छोटे वाहनधारकांना उघडयावर असलेल्या गटारीमध्ये पडत असल्याचे प्रकार घडत आहे . तरी नगर परिषद प्रशासनाने तात्काळ या रस्त्यांच्या व उघडयावर असलेल्या गटारीचे ढाप्यांची कामे त्वरीत करावी अशी मागणी ललीत परमार्थीयांनी केली असुन यावेळी मुख्याधिकारी मनोज म्हसे , नगर परिषदचे बांधकाम अभियंता योगेश मदने व आदी यावेळी उपास्थित होते .

Leave a Comment