यावल येथे विविध ठीकाणी शहीद दिवसानिमत्त क्रांतीवीर शहीद भगतसिंग , राजगुरू व सुखदेव यांना अभिवादन

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

शहीद क्रांतीकारक भगतसिंग , शिवराम राजगुरू , सुखदेव हिन्दुस्थानातील ब्रिटीस साम्राज्याविरुद्धच्या स्वातंत्र्याच्या लढयात त्यांनी केलेल्या हिंसात्मक कार्यामुळे वयाच्या अवघ्या २ ३ व्या वर्षी २३ मार्च १९३१ साली त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. या क्रांतीकारी विर शहीदांच्या स्मृतीदिना निमित्त आज यावल पंचायत समितीच्या सभागृहात गटविकास अधिकारी डॉ . निलेश पाटील , एस एस तायडे , कनिष्ठ प्रशासन अधिकारी रिधे, श्रीमती सुनिता सोनवणे , आर पी देशमुख ,लतेश नेमाडे, आशिक पिंजारी , के एस पाटील , विशाल राऊत , जावेद तडवी , अक्षय शिरसाळे , मोहन हिरळकर , मिलींद कुरकुरे , भुषण मेढे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहुन शहीदाच्या प्रतिमेचे पुजन करून विनम्र अभीवादन केले . यावल तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय ईमारतीत प्रभारी तहसीलदार आर डी पाटील , निवासी नायब तहसीलदार आर के पवार , सुयोग्य पाटील , रविंद्र माळी , दिपक भुतेकर, निशा चव्हाण, सुरज जाधव यांच्या उपस्थितीत शहीद दिवस साजरा करण्यात येवुन क्रांतीविर शहीद भगतसिंग , राजगुरू , सुखदेव यांच्या प्रतिमा पुजन करून भावपुर्ण आदरांजली अपर्ण करण्यात आली .

Leave a Comment