यावल येथे विविध घटनामध्ये मरण पावलेल्या नागरीकांच्या कुटुंबास शासनाच्या वतीने १० लाखांची आर्थिक मदत

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील विविध कारणांनी अपघातात अक्समात मृत्यु पावलेल्या कटुंबातील कुटुंब प्रमुखांना राज्य शासनाच्या वतीने मिळणाऱ्या योजनेच्या माध्यमातुन मिळणाऱ्या शासकीय आर्थिक मदत यावल येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात यावल रावेर क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी व चोपडा आमदार सौ .लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली.
यावल येथील पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास आमदार शिरिष चौधरी , आमदार सौ . लताताई सोनवणे , पंचायत समितीच्या सभापती सौ .पल्लवी चौधरी , उपसभापती योगेश भंगाळे , जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे , पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील , पंचायत समिती भाजपाचे गटनेते दिपक अण्णा पाटील , निवासी नायब तहसीलदार आर के पवार , पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी विलास भाटकर , ग्रामविस्तार अधिकारी हबीब तडवी, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी किशोर सपकाळे, शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले , पप्पु जोशी , संतोष खर्चे यांच्यासह आदी राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते .दरम्यान यावेळी रावेर आणी चोपडा मतदारसंघातील सहा लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत प्रत्येकी २० हजार रुपये प्रमाणे एक लाख रुपये , नैसर्गीक आपत्तीत मदतीअंतर्गत न्हावी येथील विज अंगावर कोसळुन मरण पावलेले हमीद तडवी यांच्या कुटुंबास चार लाख तर मालोद येथे अंगावर भिंत कोसळुन मरण पावलेल्या मुलीच्या कुटुंब प्रमुख दगडू भावडु तडवी यांना चार लाख आणी हिंगोणा येथील आत्महत्या केलेले शेतकरी किसन राणे यांच्या कुटुंबास १लाख रुपयांचे धनादेश अशा प्रकारे १० लाख रुपयांची मिळालेल्या शासनाच्या आर्थिक मदतीचे धनादेश वितरीत करण्यात आली .

Leave a Comment