यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
,येथील तहसील कार्यालयाच् या वतीने आज जागतिक महीला दिनानिमित्त कर्तृत्ववान महीला यांनी आपल्या कार्याच्या चाकोरीत राहुन निवडणुक आयोगाच्या मतदार नोंदणी अभीयानात उल्लेखनिय कार्य केल्या बद्दल प्रशस्तीपत्र देवुन सन्मानित करण्यात आले . दरम्यान आज ८ मार्च रोजी जागतिक महीला दिनानिमित्त यावल तालुक्यात राबविण्यात आलेल्या राज्य निवडणुक आयोगाच्या नविन मतदार नोंदणी या अभियानात एक स्त्री म्हणुन वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असतांना या वाटेवरील अनेकविध आव्हाणे घेवुन उतुंग भरारी घेण्यासाठी आकाशाला गवसणी घालण्यासाठी सुरू असलेली महीलांची धरपड ही कौतुकास्पद असुन , या महीलांनी केलेले प्रशासनासाठीचे कार्य हे सदैव प्रेरणादायी राहीला याच दृष्टीकोणातुन यावलचे तहसीलदार महेश पवार , निवासी नायब तहसीलदार आर के पवार , यावल निवडणुक शाखेचे नायब तहसीलदार राहुल सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशस्तीपत्र देवुन रूपाली अशोक तळेले ( ग्रामसेविका चितोडा ) समिधा वासुदेव अडकमोल ( कृषी सहाय्यक ) , अर्चना विजय कोल्हे (करंजी बिएलओ ) , शितल विजय चौधरी , अंकीता वाघमळे ( तालुका पुरवठा निरिक्षक यावल ) , निशा ए चव्हाण ( अव्वल कारकुन महसुल यावल ) , बी एन इंगळे ( महसुल सहाय्यक यावल ) , यु एम हनवने ( महसुल सहाय्यक यावल ) , गायत्री रविन्द्र बडगुजर ( बॉम्बे हायकोर्ट क्लर्क ) , विद्या कांतीलाल बारेला ( सशस्त्र सिमा दल ) यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्याबद्दल सन्मान करण्यात आला , या प्रसंगी महसूलचे विविध कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते .