यावल येथे तहसील कार्यालयात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या अकलुदच्या पोलीस पाटीलास केले निलंबीत,

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे,

तालुक्यातील अकलूद येथील पोलिस पाटील किरण मुरलीधर वानखेडे यास येथील तहसील कार्यालयात दारू पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी फैजपुर विभागाचे प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी आज निलंबित केले.
यावल पोलिस पाटील किरण वानखेडे याने गेल्या सोमवारी (ता. १५) दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास सोबत असलेल्या एका दारूड्या व्यक्तीसह येथील तहसील कार्यालयात तहसीलदार महेश पवार यांचे दालनात दारुच्या नशेत गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिस पाटील किरण वानखेडे यांचेविरूध्द यावल पोलीस स्टेशन मध्ये
गुरन ७/२०२१ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कालम ८५ (१), ११२, ११७ दि १५/०३/ २०२१ रोजी गुन्हा दाखल करणेत आलेला आहे. येथील पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन त्यास अटक झाली होती.
गुन्ह्याबाबतचे प्रकरण व विभागीय चौकशीच्या अधिन असून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ नियम ४च्या पोटनियम (१) तसेच उपोद्घतातील अ. क्र.२ चे महाराष्ट्र ग्राम पोलिस अधिनियम १९६७ चे कलम ११ अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी पोलिस पाटील किरण मुरलीधर वानखेडे यास पुढील आदेशापावेतो तात्काळ निलंबीत करण्याचे आदेश आज बजावले आहेत.

Leave a Comment