यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे एका नराधमाने ८वर्षाच्या अल्पवयीन चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिचा अत्यंत निर्दयीपणे खुन केल्याच्या घटनेच्या निषेधार्ता यावल येथे सर्वधर्मिय मुकमोर्चा काढण्यात येवुन आरोपीस कठोर शासन व्हावे अशी मागणी करण्यात आली .
यावल येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या परिसरातुन आज दिनांक ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११वाजता गोंडगाव तालुका भडगाव येथे घडलेल्या ८ वर्षीय कल्याणी या बालीकेवर गावातीलच एका नराधमाने तिच्यावर लैगिंग अत्याचार करीत तिचा निर्दयीपणे खुन केल्याची घटना घडली असुन ,
या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेतील त्या नराधमास पोलिसांनी अटक केली असुन, गुन्ह्यातील नराधम आरोपीस जलदगती न्यायलयातुन तात्काळ कठोर शिक्षा व्हावी या मागणी करीता सर्वधर्मीय व सर्वपक्षीय मुकमोर्चा तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला
,यावेळी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, पुरवठा निरिक्षण अधिकारी अर्चना भगत यांच्या उपस्थितीत चिमुकल्या मुलींच्या हस्ते असंख्य नागरीकांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन देण्यात आले
, यापुर्वी तहसीलच्या आवारात जमलेल्या सर्वधर्मीय व सर्वपक्षीय नागरीक मोर्चात सहभागी लहान चिमुकल्या व महिला यांच्या वतीने दुदैवी कु कल्याणी पाटील हिला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली .यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील , काँग्रेसचे शेखर पाटील , शहराध्यक्ष कदीर खान, आदिवासी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष एम बी तडवी , शिवसेना ( उबाठा)चे अजहर खाटीक , रिपाइ चे तालुका अध्यक्ष विष्णु पारधे यांच्यासह मोठया संख्येत महिला भगिनी व चिमुकल्या मुली यांनी या मुकमोर्चात सहभागी होवुव अत्याचारास बळी गेलेल्या कल्याणीला न्याय मिळुन देण्याची मागणी केली .