यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
केन्द्रातील भारतीय जनता पक्षाच्या शासनाने बहुमताच्या जोरावर मंजुर केलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे तात्काळ रद्द करून सर्व क्षेत्रात वाढलेली महागाईवर अंकुश लावावे या मागणीसाठी आज तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण करण्यात आले .दरम्यान भारतीय कॉग्रेस कमेटीचे यावल तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद गटाचे नेते प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध देशाच्या अन्नदाता व कामगार यांना देशोधडीला लावणारे काळे कायदे रद्द करावे या मागणीसाठी दिल्ली राज्याच्या सिमेवर गेल्या शंभर दिवसापासुन आंदोलन सुरू असुन या देशव्यापी आंदोलनात आज पर्यंत सुमारे ३००हुन अधिक शेतकरी बांधवांचा मृत्यु झाला असुन , केन्द्र शासनाने पारीत केलेले हे काळे कायदे शेती व्यवसाय व शेतकऱ्यांना पुर्णपणे उद्धवस्त करणारे आहेत .केन्द्र शासन या काळ्या कायद्याच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना बडया भांडवलदारांचे गुलाम बनविण्याचा सरकारचा डाव आहे .कॉंग्रेसच्या अध्यक्षा खा . श्रीमती सोनिया गांधी व खा . राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनास आपला पाठींबा दिला असुन, देशातील ६oलाख शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन राष्ट्रपतींना देवुन काळे कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे . असे असतांनाही केन्द्रातील भाजपाचे कुंभकर्णी सरकारला जाग आलेली नाही . दुसरीकडे पेट्रॉल , डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसचे वाढलेली प्रचंड किमती वाढवुन केन्द्र शासना दिवसाढवळ्या लोकांच्या खिशावर दरोडा टाकत असुन, केन्द्राच्या कृषी बदलांमुळे रेशनिंग बंद होणार आहे . या सर्व केन्द्र शासनाच्या भोंगळ शेतकरी सामान्य नागरीक विरोधी कारभारामुळे देश देशोधडीला लागले असुन , या सर्व गोंधळलेल्या दिशाहीन शासनाच्या विरूद्ध काँग्रेस कमेटीच्या वतीने यावल तहसील कार्यालया समोर कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी , जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व पंचायत समिती गटनेते शेखर सोपान पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले , पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी , खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भिरूड, इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील , काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान , नगरसेवक गुलाम रसुल हाजी गु . दस्तगीर , नगरसेवक असलम शेख नबी , कौग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान ,नावरे येथील मा .सरपंच समाधान पाटील , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष करीम मन्यार , हाजी ताहेर शेख चाँद , राष्ट्रवादीचे निवृत्ती धांडे , अनिल जंजाळे , विक्की पाटील आदींनी या उपोषणात आपला सहभाग नोंदवला . याप्रसंगी उपोषणाच्या ठीकाणी प्रभारी तहसीलदार रवीन्द्र पाटील , निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांनी भेट देवुन उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकुन घेतले .