यावल भुसावल मार्गावर मोटरसायकल चालवितांना अचानक हृदयविकाराचा झटका दुचाकी कोसळुन एक ठार तर दोन जख्मी

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील यावल भुसावल मार्गावरील रस्त्यावर भुसावल हुन दुचाकी वाहनाने यावल कडे येत असतांना वाहन चालविंंता सायंकाळच्या सुमारास यावल पासुन ३ किलो मिटर लांब असलेल्या हतनुर पाटचारी वरून येतांना

अचानक हृदयविकाराचा तिव्र झटका आल्याने चोपडा येथील फकीर वाडा फुलेनगर येथे राहणारे राजु बशीर पिंजारी वय५५ वर्ष हे भुसावळ येथुन लग्नाच्या कार्यक्रमातुन आपल्या कुटुंबा सोबत परत येत असतांना त्यांच्या ताब्यातील दुचाकी वाहनाचा तोल सुटल्याने पाटचारीत मोटरसायकल कोसळल्याने राजु पिंजारी यांचा जागीच मृत्यु झाला असुन,

त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या पत्नी व मुलगा देखील या अपघातात गंभीर जख्मी झाला असुन, अपघातच्या स्थळी भुसावळ कडुन येणारे जितेन्द्र सोनवणे व त्यांच्या मित्रांनी तात्काळ १o८या रुग्णवाहीके साठी संपर्क करून तात्काळ त्यांना रुग्णालयात पाठविण्यात आले ,

या ठिकाणी जखमींना प्रथम यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी व त्यांच्या आरोग्य कर्मचारी यांनी जख्मींवर प्रथम प्राथमिक उपचार करून त्यांना तात्काळ खाजगी वाहनाने तात्काळ चोपडा येथे खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे .

अशा प्रकारे झालेल्या अपघाताचे वृत्त कळताच यावलच्या ग्रामीण रुग्णालयात बघण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती .

Leave a Comment