यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
तालुक्यात होम टु होम होणार कोरोना विषाणु संसर्गाच्या संदर्भात नागरीकांची आरोग्य तपासणी याबाबत आज महसुल प्रशासन , आरोग्य विभाग , नगर परिषद तथा शिक्षण विभागाव्दारे घेण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीत या विषयावर सविस्तर करण्यात आली चर्चा . दरम्यान यावल तहसील कार्यालयाच्या नुतन प्रशासकीय ईमारतीच्या कार्यालयात आज दिनांक २३ मार्च रोजी सकाळी १० , ३०वाजता प्रभारी तहसीलदार आर डी पाटील , निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना संक्रमणाच्या वेगाने वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर शासनाच्या आदेशाची तात्काळ अमलबजावणी व्हावी या दृष्टीकोणातुन यावल तालुक्यातील विधिध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेण्यात आली . दरम्यान यावल तालुक्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आणी रुग्णांची वाढती संख्याही प्रशासना करिता चिंतेचा विषय बनले असुन , शासन पातळीवर कोरोना संक्रमणाचे उच्चाटंन गाठण्यासाठी युद्धपातळीवर विविध उपाय योजना राबविण्यात येत आहे . याच पार्श्वभुमीवर आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातुन गावनिहाय व शहरी क्षेत्रातील होम टु होम प्रत्येक नागरीकांच्या आरोग्याची तपासणीची मोहीम आजपासुन सुरू करण्यात आली असुन या करीता ग्रामीण पातळीवर शिक्षक , आरोग्य सेविका, आशा कर्मचारी यांचे संयुक्तगट या आरोग्य तपासणी मोहीमेत सहभागी झाले असुन , प्रतिदिन सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयास या कोरोना रुग्णांच्या तपासणीचा अहवाल सादर करावा लागणार असल्याचे यावेळी महसुल प्रशासनाच्या वतीने मार्गदर्शनपर माहिती देतांना सांगण्यात आले . या कोरोना रुग्ण तपासणी मोहीम संदर्भातील आढावा बैठकीस प्रभारी तहसीलदार रविन्द्र पाटील , निवासी नायब तहसीलदार आर के पवार , तालुका आरोग्य अधिकारी डॉ . हेमन्त बऱ्हाटे , नगर परिषदचे मुख्यधिकारी बबन तडवी, फैजपुर नगर परिषद मुख्यधिकारी किशोर चव्हाण, यावल ग्रामीण रुग्णालयाचे डॉ .बी बी बारेला, पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी एन के शेख , यावल नगर परिषदचे रमाकांत मोरे , शिवानंद कानडे, पं .स .चे प्रशासन अधिकारी जी एम रिढे, फैजपुरचे कर निरीक्षक बाजीराव नवले , गट समन्यवयक प्रमोद रामा कोळी, एस के शेख , सुभाष प्रकाश तायडे , न्हावीच्या केन्द्र प्रमुख सौ . जयप्रभा पितांबर बोरोले, दहीगाव केन्द्र प्रमुख विजय ठाकुर , किनगावचे केन्द्र प्रमुख प्रमोद सोनार , अंजाळे जि .प . शाळा मुख्यध्यापक मनोहर चौधरी आदींनी या सहभाग घेतला .