यावल तालुका हादरला : बोरावलला शेतात जमिनीत पुरलेला हात बॉम्ब निंदणी करतांना फुटला ; महिला गंभीर जखमी

 

यावल तालुका( प्रतिनिधी) विकी वानखेडे

यावल : तालुक्यातील बोरावल बुद्रुक शेत शिवारामध्ये निंदणी करत असतांना महिलेचा गावठी बनावटीचा हात बॉम्बला स्पर्श होताच तो फुटल्याने या घटनेत महिला गंभीर जखमी झाली.

ही धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी घडली. जखमी महिलेवर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून तिला जळगावी हलवण्यात आले.

रानडुकरांच्या शिकारीच्या उद्देशाने फासेपारधींनी हातबॉम्ब शेतात पुरल्याचा संशय आहे.

55 वर्षीय महिला गंभीर बोरावल बुद्रुक, ता.यावल या शिवारात तापी नदीच्या किनारी नरेश लक्ष्मण जावळे (रा.राजोरा) या शेतकर्‍याचे शेत असून या शेतात त्यांनी हरभरा पेरणी केली आहे.

शुक्रवारी या हरभर्‍याच्या शेतात महिला मजुर निंदणी करीत असताना बेबाबाई पंडित सोनवणे (55, रा.राजोरा) या महिलेला एक गोळा आढळला व महिलेच्या स्पर्शाने छेडछाडदरम्यान गोळ्याचा विस्फोट होवून त्यात बेबाबाई सोनवणे यांच्या डाव्या हाताला जबर दुखापत झाली.

या अपघातात त्यांच्या हाताची दोन बोटं तुटली आहेत. ब्लास्टनंतर शेतातील मजुरी करणार्‍या महिला या सैरावैरा पळाल्या.
महिलेची प्रकृती गंभीर शेतकरी नरेश जावळे यांनी जखमी अवस्थेतील महिलेला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केले.

वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवदास चव्हाण, अधिपपरीचारीका मनीषा धांडे, नेपाली भोळे, सुमन राऊत, अमोल अडकमोल आदींनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले व त्यांना तातडीने पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर, उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

शिकारीच्या उद्देशाने लावले असतील हात बॉम्ब
शेतासह परीसरात फासेपारधींकडून रानडुकरांच्या शिकारीसाठी अशा पद्धतीने गावठी बनावटीचे हात बॉम्ब बनवून जमिनीत पुरले जातात.

शेत मशागतीत हा बॉम्ब जमिनीत गाढला गेल्याचा अंदाज असून महिलेने त्यास स्पर्श करून छेछाड केल्याने त्याचा ब्लास्ट झाल्याचे शेतकरी नरेश भंगाळे म्हणाल

Leave a Comment