यावल( प्रतिनिधी)विकी वानखेडे
शालेय शासकीय क्रीडा स्पर्धांसाठी यावल तालुका क्रीडा शिक्षकांची सभा दिनांक 3 ऑगस्ट 20223रोजी 11.00वाजता गटसाधन केंद्र यावल येथे गटशिक्षणाधिकारी माननीय विश्वनाथ धनके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष तथा क्रीडा समितीचे अध्यक्ष मुख्याध्यापक के यु पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या प्रसंगी व्यासपीठावर स्पर्धा समितीचे सदस्य जितेंद्र फिरके दिलीप संगेले ,श्रीमती आर. एम.पाटील,के आर सोनवणे, प्रवीण महाजन, सय्यद अश्फाक अली, एम आर महाजन ,वाय.वाय. पाटील, मुख्याध्यापक पी बी पाटील ,योगेश कोळी, आदी मान्यवर उपस्थित होते या सविचार सभेत तालुक्यातील दहा खेळांचे तारीखा व ठिकाण निश्चीत केले.
तालुकास्तरीय क्रीडा श्री दत्त हायस्कुल चिखली,विकास विद्यालय सातोद,डाॅ.डी के सी विद्यालय डांभुर्णी,न्यु इंग्लिश स्कूल भालोद,इंग्लिश मेडियम निवासी माध्यमिक स्कूल दोनगांव,प्रभात विद्यालय हिगाेणे ,पाेदार स्कूल अकलुज,घ.का. विद्यालय आमाेदे, इंदिरा गांधी यावल या ठिकाणी 14,17,व 19 या वयोगटातील मुले आणि मुली च्या स्पर्धाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला.
तालुका सर्व जिल्हास्तर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी मुख्याध्यापक के यू पाटील यांनी मार्गदर्शन व सूचना दिल्या नव नियुक्त यावल तालुका क्रीडा समन्वयक पदी. दिलीप बिहारी संगेले तसेच माध्यमिक शिक्षक पतपेढी मधे निवडून आलेल्या बद्दल अश्विनी काेळी मॅडम व याेगेश काेळी सर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला यासंदर्भात या सभेत यावल तालुक्यातील विविध खेळातील क्रीडा शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र फिरके यांनी केले