यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आदीवासी बांधवांच्या ग्रामीण भागातुन धावणारी पठाणकोट एक्सप्रेस या नांवाने ओळखली जाणारी एसटी बस सेवा पुनश्च सुरू करावी या मागणीसाठी परसाडेगावाच्या सरपंच मिना तडवी यांनी घेतली आगार अधिक्षकांची भेट .
यावल आगारातुन सुमारे दोन ते अडीच वर्षापुर्वी रावेर यावल व चोपडा परिसरातील आदीवासी बांधवांच्या थेट गावांना व पाडवांवर सोडणारी पठाणकोट एक्सप्रेस ही एसटी बस सेवा सुरू करण्यात आली होती . ही बससेवा बंद पडल्याने अतिदुर्गम क्षेत्रात राहणाऱ्या आदीवासी बांधवांना दळणवळणाचे प्रमुख साधन व शैक्षणिक कार्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने ही बससेवा कधी सुरू होणार असा प्रश्न ग्रामीण भागातील आदीवासी ग्रामस्थांना पडला आहे,
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आदीवासी चोपडा ते रावेर ही पठाणकोट मार्गावर धावणारी बायपास एसटी बस काहीं काळानंतर अचानक बंद करण्यात आल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या आदिवाशी बांधवांना मोठ्या प्रमाणावर अडचणीचा सामना करावा लागत असल्याने या समस्यांची माहीती देण्यासाठी परसाडे गावाच्या लोकनियुक्त सरपंच सौ मिना तडवी यांनी थेट यावल आगाराचे सहाय्यक वाहतुक अधिक्षक जि.पी .जंजाळ यांची भेट घेऊन ही बससेवा पुर्वरत सुरू करावी या विषयाला घेवुन त्यांच्याशी चर्चा केली
. मागील दोन वर्षातील कोरोना संसर्गाच्या काळात राज्यातील एसटी महामंडळाच्या बसला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते . कोरोनाचा गोंधळ संपुष्टात आले असुन यावल आगाराने पठाणकोट एक्सप्रेस नांवाने ओळखली जाणारी बससेवा पुुनश्च सुरू झाल्यास एसटी महामंडळाच्या उत्पनात भर पडेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली,
या संदर्भात परसाडे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत ही बस् सुरू करण्याबाबतचा ठराव प्रस्तावित केल्यास त्याचा पाठपुरावा करून आम्हीं ती मागणी जळगावचे डीसी कडे प्रस्ताव पाठून जिल्हा स्तरावरून आदेश प्राप्त झाल्यास ही बस पूर्ववत सुरू करण्यात येईल असे आगार प्रमुख यांच्या कडून सांगण्यात आले,,
याप्रसंगी परसाडे ग्रामपंचायतच्या सरपंच मीना तडवी , यावल एसटी आगारातील कर्मचारी सलिम इस्माईल तडवी , रज्जाक इस्माईल तडवी , बबलू तडवी (वाहक ) , फिरोज सिकंदर तडवी ,अकिल इस्माईल तडवी , शशि सपकाळे , पुनमचंद पाटील यांच्यासह आगारातील कर्मचारी या वेळी उपस्थित होते,