यावलचे शुक्रवारी भरणारे आठवडे बाजार कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर बाजार प्रशासनाने रद्द केले आहे

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे,

येथील शहरात शुक्रवारच्या दिवशी भरणारे आठवडे बाजार कोरोना विषाणु संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर खबरदारीचा उपाय म्हणुन नगर परिषद प्रशासनाने बाजार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .दरम्यान मागील काही दिवसांपासुन महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या अत्यंत घातक समजल्या जाणाऱ्या दुसऱ्या टप्याने पुनश्च आगमन केले असुन , जळगाव जिल्ह्यात देखील सातत्याने बाधीत रुग्णांची संख्या वाढली असुन या मुळे नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोणातुन जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावले असुन , यातच यावल तालुक्यातील मोठया गावांना भरणारे आठवडे बाजारासह यावल शहरात शुक्रवारच्या दिवशी भरणारे आठवडे बाजार देखील नगर परिषद प्रशासनाने घेतले असुन, अशा प्रकारची जाहीर दवंडी देखील शहरात करण्यात येत आहे . सदरच्या यावल शहरात भरणारे आठवडे बाजारात जळगाव जिल्ह्यातुन विविध ठीकाणाहुन् मोठया प्रमाणावर व्यापारी व शेतकरी बांधव हे जिवनावश्यक वस्तुंची विक्री करण्यासाठी येत असतात याच पार्श्वभूमीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी पुढील आदेश येण्यापर्यंत प्रशासनाने आठवडे बाजार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे . याची तालुक्यातील शेतकरी बांधव आणी व्यापाऱ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन नगर परिषदचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी केले आहे .

Leave a Comment