मोताळा शहरातील अवैध व्यसाय त्वरित बंद करा..अन्यथा क्रांतीदिनी संघटणेच्या वतीने आंदोलन….

 

बुलडाणा :- पंकज थिगळे

बुलडाणा :- आठवडी बाजार मोताळा येथे सुरू असलेले वरली, मटकाचा, अवैध व्यसाय त्वरित बंद करा अशी मागणी भूमी हक्क परिषदेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष के.जी.शाह यांनी आज शुक्रवार दिनांक 22 जुलै 2022 रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. भूमी हक्क परिषदेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे. की
मोताळा शहरातील आठवडी बाजारामध्ये खुलेआम वरली मटक्याची दुकाने थाटलेली असून आठवडी बाजारातील देवीच्या मंदीराला लागून मागे व पुढे मोठ्या प्रमाणात वरली, मटक्याची दुकाने खुलेआम सुरु असून या अवैध व्यवसायाकडे पो.स्टे. बोराखेडी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. सदरचे बेकायदेशिर व्यवसाय त्वरीत बंद करण्यात यावे.

वरली मटका खेळणारे मोठ्या प्रमाणात आठवडी बाजारातील देवीच्या मंदीरासमोर व मागे मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या गर्दीमुळे व वरली मटक्याच्या पैश्याच्या घेवाण देवाणीवरुन अनेक वेळा वाद निर्माण होतात. त्यातुन शांतता व सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या व्यवसायाकडे तरुण युवा वर्गाचा वाढता कल असून त्यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. मोताळा शहरात गुरुवार या दिवशी मोठा आठवडी बाजार भरतो. या बाजारामध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात महिला येतात. त्यामुळे या वरील, मटक्याच्या व्यवसायामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या बाबीची गांभीर्याने दखल घेवुन जिल्हा पोलीस प्रशासनाने तात्काळ वरली मटक्याचा अवैध व्यवसाय बंद करण्यात यावे अन्यथा
लोकशाही मार्गाने दिनांक ९ ऑगष्ट, २०२२ रोजी क्रांतीदिनी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के.जी.शाह यांची स्वाक्षरी आहे.

Leave a Comment