सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )
चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथील शेतकऱ्यांच्या वापरासाठी असलेल्या शेत रस्ता व नाली वरच पाटबंधारे विभागाने त्याचा वापर कालव्यासाठी केला आहे अशी संतापजनक घटना मेरा खुर्द येथे घडली आहे ‘सविस्तर वृत्त अशी की मेरा खुर्द येथे पाटबंधारे विभाग बुलढाणा यांनी अधिग्रहित केलेल्या जमिनीवर शेत रस्ता व नाली चा वापर कालव्यासाठी 0. 27 आर .जमीन घेऊनलघु पाटबंधारे विभागाने यावर पाट ‘कालवा टाकला नाही .तर अगोदरच असलेल्या नाली व शेत रस्त्यावरच कालव्याचा पाट टाकला गेला आहे .व बांधकाम केली आहे ‘त्यामुळे शेत रस्ता व नाली पूर्णपणे बजून गेली असून त्या नालीच्या शेजारील आसपासच्या 30 ते ४० शेतामध्ये पाऊस पडल्यानंतर पाणी तसेच साचून राहते ‘त्यामुळे शेतीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुस्कान होत आहे ‘व शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा रस्ता राहत नाही व शेत रस्ता हा पूर्णपणे बंद झाला आहे ‘याला पूर्णपणे लघु पाटबंधारे विभाग बुलढाणा जबाबदार आहे असा आरोपही शेतकऱ्यांनी निवेदनात केला आहे ‘मेरा खुर्द येथील बँक ऑफ महाराष्ट्रा च्या जवळील शेत रस्त्यावरच लघु पाटबंधारे विभागाने कालवा बांधला आहे त्यामुळे लघु पाटबंधारे विभागाने अधिग्रहित केलेल्या जमिनीवर पाट न बांधता रस्त्यावरच पाट बांधल्यामुळे शेतकरी आक्रमक झाली आहे ‘याबाबत त्यांनी या आशयाचे निवेदन दिनांक 30 डिसेंबर रोजी लघु पाटबंधारे विभाग उपविभागीय अधिकारी खडकपूर्णा प्रकल्प दे . राजा यांना निवेदन दिले आहे ‘या निवेदनावर ज्ञानेश्वर शंकर भुसारी, प्रकाश नामदेव भुसारी, भास्कर नामदेव भुसारी, बाजीराव नामदेव भुसारी, तेजराव नामदेव भुसारी, सुधाकर नारायण भुसारी, परमेश्वर नारायण भुसारी, प्रकाश रावसाहेब भुसारी ,उमेश रावसाहेब भुसारी ‘ निलेश बाजीराव भुसारी, गजानन तेजराव भुसारी, नंदकिशोर प्रकाश भुसारी, दिनकर विठोबा शेळके ,शंकर विठोबा शेळके ,संदीप प्रल्हाद शेवाळे, रईस देशमुख ‘जावेद देशमुख ‘नंदू आत्माराम वराडे ‘रमेश आत्माराम वराडे .शशिकांत रामकृष्ण वराडे ‘आधी शेतकऱ्यांच्या या निवेदनावर सही आहेत,