प्रतिनिधी- सुनिल वर्मा
लोणार तहसिल अंतर्गत येत असलेल्या बिबी महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी दादाराव खरवाल यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी भाजपचे कायम निमंत्रीत जिल्हा सदस्य देवानंद सानप यांनी मंत्रालय मुंबई येथे जाऊन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखि तक्रार केली आहे.
तक्रारीत असे म्हटले आहे की मंडळ अधिकारी दादाराव खरवाल हे त्यांच्या मुख्यालयी बिबी येथे कधीच हजर नसतात ते सतत तालुक्याच्या ठिकाणी लोणार येथे असतात त्यामुळे बिबी मंडळातील सोळा गावातील शेतकऱ्यांना सतत चकरा माराव्या लागतात तरी पण मंडळ अधिकारी मुख्यालयी दिसुन येत नाही त्यामुळे आर्थिक, मानसिक, नुकसान होत आहे अनेक शेतकरी मंडळ अधिकारी यांना कामासंदर्भात फोन करतात तर मंडळ अधिकारी शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलतात काय कराचं करुन घ्या अशा धमक्या देतात.
बिबी महसूल मंडळातून खडक पुर्णा नदी जाते अनेक ठिकाणी अवैध वाळू उपसा व वाहतूक केल्या जाते सदर उपसा मंडळ अधिकाऱ्याच्या आशीर्वादने लक्ष्मीदर्शन देऊन घेऊन सुरु असल्याची खमंग चर्चा सुरु आहे.
अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीच्या नोंदी दादाराव खरवाल यांनी हेतुपुरस्सर पैसे न दिल्यामुळे थांबल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या सोलर पंप च्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे विहिरीची नोंद नसल्यामुळे विद्युत कनेक्शन सुद्धा मिळत नाही त्यामुळे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे याला मंडळ अधिकारीच जबाबदार असुन अशा मुजोर मंडळ अधिकार्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी देवानंद सानप यांनी केली आहे.
या संदर्भात लोणार चे तहसीलदार जोशी यांना सुध्दा या प्रकरणाची माहिती दिली असून काय कारवाई करतात याकडे बिबी मंडळातील सोळा गावातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे