मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांमागे इंडियन मुजाहिद्दीन?;  पोलिसांच्या तपासाला वेग……

0
640

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कंबाला हिल परिसरातील घऱाजवळ स्फोटक साहित्याने भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे.
ही कार रोडवर अंबानी यांच्या ‘अॅन्टिलिया’ निवास्थानाजवळ उभी करण्यात आली होती.
गाडीत जिलेटिन या स्फोटकांच्या सुट्ट्या कांड्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान घटनेनंतर अंबानींच्या घराबाहेरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
दुसरीकडे तपासदेखील सुरु करण्यात आला आहे.
रिपब्लिकने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई क्राइम ब्रांचने तपास हाती घेतला असून १० पथकं तयार करण्यात आली आहेत.
एक टीम परिसरातील सर्व सी.सी.टी.व्ही तपासणार आहेत.
तर दुसरी टीम वाहतूक मुख्यालयाती कॅमेरांमधील फुटेज तपासणार आहे.
एक टीम क्रॉफर्ड मार्केटमधील मुंबई पोलीस मुख्यालयातील सी.सी.टी.व्ही. तपासणार आहे.
चौथी टीम आजुबाजूच्या परिसरातील संशयास्पद लोकांची माहिती मिळवणार आहे.
तर एक टीम संशयितांची माहिती मिळवण्यासाठी फॉरेन्सिक टीमच्या संपर्कात आहे.
“नीता भाभी और मुकेश भैय्या, ये तो ट्रेलर है”, स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओमध्ये पोलिसांना सापडलं पत्र दरम्यान इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित एका सदस्याची माहिती मिळवण्याची जबाबदारीदेखील एका टीमवर सोपण्यात आली आहे.
इंडियन मुजाहिद्दीनच्या या सदस्याने २०१३ मध्ये अंबानींच्या मरिन ड्राइव्हमधील कार्यालयात धमकी देणारं एक पत्र पाठवलं होतं.
इतर दोन टीम आतापर्यंत हाती आलेल्या माहितीच्या आधारे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चौकशी करत आहेत.
याशिवाय पोलीस बी.एम.सी. पार्किंगमधील फुटेजची तपासणी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here