विकी वानखेडे यावल
येथील जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांची सहकारी पतपेढी मर्यादित भुसावळ या संस्थेची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा प्रभाकर हॉल येथे संपन्न झाली या बैठकीमध्ये सभासदांना सप्टेंबर अखेर नफ्याच्या 15 टक्के डिव्हिडंट वाटप करण्यात येणार आहे तसेच पतपेढीच्या विकासासाठी विविध विषयांवर चर्चा होऊन सभा संपन्न झाली
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गोपाळ पाटील होते यावेळी उपाध्यक्ष राजु लवांडे मानद चिटणीस विनोद पाटील खजिनदार प्रशांत सोनवणे संचालक शैलेंद्रकुमार महाजन नरेंद्र कुमार दोडके चेतन तळले अश्विनी कोळी ज्ञानेश्वर मोझे गोपाळ महाजन तुळशीराम सोनवणे दीपक गुळवे अमित कुमार परखड चेतन चौधरी नीलिमा नेमाडे तज्ञ संचालक राजेश महाजन आदी उपस्थित होते
बैठकीच्या सुरुवातीला मयत सभासद सैनिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली यानंतर संस्थेचा मागील सभेचे इतिवृत्त विनोद पाटील यांनी वाचून दाखवले यानंतर कार्यकारी मंडळींनी केलेला वार्षिक अहवाल तेरीज पत्रक नफा तोटा पत्रक ताळेबंद नफ्याची वाटणी शेअर डिवीडंट अंदाजपत्रकापेक्षा कमी अधिक झालेल्या खर्च मंजुरी चालू वर्षाच्या अंदाजपत्रकास मंजुरी हिशोब तपासणी अहवाल वाचून दप्तरी दाखल करणे.
वैधनिक लेखापरीक्षक यांचा तपासणी अहवाल तपासून दप्तरी दाखल करणे स्थानिक हिशोब तपासणीस यांची नियुक्ती करणे लेखापरीक्षक नियुक्ती करणे सभासदांचा जनता अपघात विमा पॉलिसी मुदत नूतनीकरण करणे वेळोवेळी लागणारे कर्ज उभारणीचे अधिकार कार्यकारी मंडळाला देणे यासह विविध 17 विषयांवरती या ठिकाणी चर्चा झाली
इस्रोचा केला अभिनंदनचा ठराव
इस्रो या संस्थेच्या वतीने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या चंद्रयान तीन चे लँडिंग केले तसेच सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य एल वन पाठवून भारत देशाचे नाव संपूर्ण विश्वात सुवर्ण अक्षरात लिहिले गेल्याने इसरो संस्थेचा अभिनंदन ठराव या सभेत पारित करण्यात आला
अहवालातील चुकांवरून धारेवर धरले
पतपेढीचा 36 वा वार्षिक अहवाल व ताळेबंद सभासदांना दिल्यानंतर या अहवालात चुका झालेल्या होत्या याबाबत सभासद एस एस अहिरे यांनी संचालक मंडळाला धारेवर धरले व यापुढे अशा प्रकारच्या चुका होणे योग्य नसल्याचे सांगितले तर गोपाळ पाटील यांनी पुढील वर्षी अहवाल छापताना विशेष व्यक्तीची दुरुस्तीसाठी नेमणूक करण्यात येईल असे सांगितले