मातंगपुरी परिसरातील नागरिक चार वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत.

 

तहसील कार्यालय शेगाव येथे मातंगपुरी परिसरातील खाजगी मालमत्ता धारक 51 कुटुंबाना नोटीस देऊन हजर राहण्याचे प्रशासनाने कळविले होते. त्या निमित्याने सर्व खाजगी मालमत्ता धारक उपस्तित होते. मातंगपरी पुनर्वसन होऊन चार वर्ष उलटून गेले तरी सुद्धा.अद्याप पर्यंत मातंगपुरी परिसरात राहणाऱ्या खाजगी व प्रशासना च्या नजरेत असलेले अतिक्रमण धारक कुटूंबाना देऊ केलेला जागेचा मोबदला मिळाला नसून.मातंगपुरी रहिवाशांना पुनर्वसन या गोळ नावाखाली अतिक्रमण धारक म्हणून काढून दिले भूसंपादन केले. आता मात्र मातंगपुरी परिसरातील कुटूंबांना खाजगी मालमत्ता धारक म्हणून नोटीस देण्यात आली हा नेमका काय प्रकार आहे. या बद्दल मातंगपुरीतील नागरिकांना च्या वतीने मी प्रश्न उपस्तीत केला असता. ते पुरते निशब्ध झाले. त्यांनी बोलावलेल्या बैठकीत s.d.o साहेब यांची उपस्तिती अनिवार्य होती. s.d.o त्यांचा प्रभारी चार्ज माझ्या केळे आहे. असे त्यांनी सांगितले. तेव्हा जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी बोलणे करून द्यावे.
तेव्हा तुम्ही मला लेखी अर्ज द्या मी जिल्हाअधिकारी यांना तत्काळ कळवितो. व या नंतरच्या बैठकीत s.d.o साहेब राहतील असे संकेत दिल्या मुळे, बरेच काही करण्याचे राहून गेले. मातंगपुरी चे पुनर्वस करून ज्या म्हाडा कॉलनी मध्ये पुनर्वसीत केले त्या म्हाडा कॉलनी मधल्या सदनिकांचे पाळझळ चालू आहे.भविष्यात तिथ मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास शासनाला जाब विचारल्या शिवाय राहणार नाही. असा असा इशीरा स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांच्या कळून प्रभारी s.d.o.याना देण्यात आला.

Leave a Comment