माजी नगरसेवक आणि शिवसेनेच्या मागणीला आले यश…. शहरात झाली धुळ फवारणीला सुरवात

 

सिंदी रेल्वे ता.१० : एक महीण्यापुर्वी माजी नगरसेवक आणि शिवसेना (उ.बा.ठा ) तर्फे शहरात डासांच्या बदोबस्तासाठी धुळ फवारणी करण्याच्या मागणीला यश आले असुन सोमवारी( ता.९) पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने धुळ फवारणीला सुरवात करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की,सततधार पावसामुळे शहरात डासांचे प्रमाण लक्षनिय वाढल्यांने डासांपासुन होणारे संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता पाहता डासांचा बदोबस्त म्हणून पालीकेला धुळ फवारणी करण्याची मागणीचे निवेदन पालीका मुख्याधिकारी यांना एक महीण्याअगोदर माजी नगरसेवक अमोल बोंगाडे यांनी तसेच शिवसेना (उ.बा.ठा) शाखा सिंदी च्या वतीने शहरप्रमुख सचिन लांबट, तालुका उपाध्यक्ष किशोर खडतकर यांनी देऊन मागणी लावुन धरली होती.

सदर मागणीला स्थानिक दैनिकनी बातमी प्रकाशीत करुन प्रशासणाच्या समोर आणली मात्र निगरगट्ट प्रशासन
तब्बल एक महीण्याहुन अधिकचा कालावधी उलटून गेल्यावर पालीका प्रशासनाला जाग आली आणि सोमवारी (ता.९) ला रात्री पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने शहरात धुळफवारणीला सुरवात झाली.

शहरवासीयांनी माजी नगरसेवक अमोल बोंगाडे आणि शिवसेना (उ.बा.ठा) शहर शाखेचे आभार मानले.
1)माजी नगरसेवक अमोल बोंगाडे धुळ फवारणीच्या मागणीचे निवेदन देतांना
2)शिवसेना (उ.बा.ठा) निवेदन देऊन मागणी करताना

Leave a Comment