नायगाव प्रतिनिधी: सेवावर्धिनी व संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेच्या माध्यमातून साकारत आहे जलदुत प्रकल्प
सेवावर्धिनी व अॕटलास काॕपको संस्थेचा संयुक्त उपक्रम
मांजरम ता.नायगाव येथे संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी व सेवावर्धिनी संस्था पुणे यांच्या माध्यमातून महत्वकांक्षी जलदुत प्रकल्पाची अंमलबजावणी लोकसहभागाच्या माध्यमातून होत आहे.ग्रामस्तरावर पाणी वापर,पाण्याचे महत्व व व्यवस्थापन तसेच मृद व जलसंधारण कामाची शाश्वतता निर्माण करणे व गावात जलव्यवस्थापन समितीद्वारे पाणलोट प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा उद्देश जलदुत प्रकल्पाचा आहे.सदरील प्रकल्पाच्या अनुषंगाने दि.20 नोव्हेंबर रोजी जल सुरक्षा व शाश्वत आराखडा संदर्भात प्रबोधनपर कार्यक्रम जेष्ठ नागरिक श्री गोपाळ पाटील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.या प्रसंगी सेवावर्धिनी संस्था पुणे येथील अधिकारी श्री हर्षण पाटील यांनी गावक-यांना जल सुरक्षा व शाश्वतता आराखडा तयार करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. शिवारातील जमिन,जंगल ,पाणी तसेच खडकाचा अभ्यास यातुन पाण्याचा ताळेबंद मांडणे व मृद ,जलसंधारण उपक्रम प्रस्तावित करणे तसेच प्रकल्प अंमलबजावणीसाठी खाजगी कंपनी,संस्था व शासनस्तरावर जलव्यवस्थापन समितीद्वारे पाठपुरावा करणे व एकंदरीत गाव पाणीदार बनवून गावाचा सर्वांगिण विकास साधणे आदी बाबत गावक-यांना प्रेरित करुन गावात पाणलोट चळवुन तयार करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था जलदुत श्री गंगाधर कानगुलवार यांनी केले व आभार प्रदर्शन श्री शिवाजी गायकवाड यांनी केले. सदरील कार्यक्रमासाठी श्री भास्करराव गायकवाड,संभाजी पा. शिंदे,सुर्यकांत पा.शिंदे,बालाजी शिंदे,विश्वनाथ पा. शिंदे,व्यंकट शिंदे ,विद्याधर जांभळे,गंगामणी श्रीगिरे व ग्रामस्त उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री विश्वनाथ पाटील शिंदे,व्यंकटराव शिंदे व शिवाजी गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
कोरोणाचे सर्व नियमांचे पालन करून सोशल डिसटंस राखुन हा क्रार्यक्रम पार पाडण्यात आला आहे.