रत्नाताई डिक्कर.खामगाव
दिनांक 15/09/2023 रोजी सद्गुरु महिला बचत गट व कार्यसिद्धी महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने भारुड स्पर्धा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. श्री गजानन महाराज मंदिर येथे संपन्न झालेल्या सदर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून सौ गौरीताई अशोक थोरात ह्या होत्या.
खामगाव अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक रमेश थोरात यांच्या त्या सुविध्य पत्नी आहेत. तसेच अध्यक्ष म्हणून सौ.स्वातीताई अनिल तराळे ह्या होत्या. स्पर्धेचे परीक्षक श्री. संजय गुरव सर व सौ .वर्षा सातव हे होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
स्पर्धेमध्ये बऱ्याच महिला सहभागी होत्या. पर्यावरण, गर्भसंस्कार, स्वच्छता. या विषयावर महिलांनी सुंदर भारुड सादर केले. सौ. गौरीताई थोरात यांनी आपल्या मनोगतातून महिला आपले घर व जबाबदाऱ्या सांभाळून अशाही उपक्रमांमध्ये सहभागी होतात त्याबद्दल त्यांचे खूप कौतुक केले.
स्वातीताई तराळे यांनी असेच सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असल्या पाहिजे असे मनोगत व्यक्त केले. श्री गुरव सर यांनी पर्यावरण या विषयावर मार्गदर्शन केले. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सौ. भोपळे यांनी पटकाविला. तर द्वितीय सौ. मुळतकर व तृतीय सौ. बोरपे यांनी मिळवला. पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या सौ . फुलवंती ताई कोरडे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम घेण्यात आला .
असे बरेच सामाजिक उपक्रम बचत गट घेत असतात. कार्यक्रमाचे संचलन सौ. कोरडे ताई यांनी केले व आभार प्रदर्शन खराटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सद्गुरु महिला बचत गट सदस्या सौ खराटे, सौ आगरकर. सौ. आटोळे. सौ. दीपा राऊत. सौ. वाकुडकर. श्रीमती राऊत. सौ.खराटे व कार्यसिद्धी महिला बचत गट सदस्य सौ वानखडे. सौ. कालणे. सौ. गावंडे. सौ. सातव. सौ मुरेकर. सौ. मते. श्रीमती गावडे. त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी परिसरातील भरपूर महिला उपस्थित होत्या.