महिला दिन विशेष सुनगाव येथील अंगणवाडी सेविकेने कर्तृत्वाने बनविले एका मुलीस करनिर्धारण अधिकारी व दुसऱ्या मुलीस पोलीस उपनिरीक्षक

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे माहेर असणाऱ्या व सुनगाव येथे रहिवाशी असणाऱ्या गीता गजानन दामधर यांचा स्वतःच्या दोन्ही मुलींना अधिकारी बनवण्यापर्यंतचा प्रवास खडतर,अथक परिश्रमाचा दुखद आहे
सुनगाव येथील गीता रामा धुळे यांचा विवाह 1993 साली अकोट येथील गजानन दामधर यांच्याशी झाला ,तीन वर्षानंतर 21 मे 1996 ला त्यांच्या पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला पतीच्या मृत्यूच्या वेळी प्रिया नावाची मुलगी 18 महिन्यांची होती तर लहान मुलगी नीता ही आईच्या गर्भात सहा महिन्याची होती अशा परिस्थितीत सासरच्या मंडळींनी कोणतीही मदत देण्यास नकार दिल्याने त्या दोन वर्ष वडिलांच्या घरी राहिल्या,नंतर स्वतःच्या बहिणीने त्यांना स्वतंत्र जागा विकत घेऊन गेल्याने त्या वेगळ्या राहायला लागल्या सुरुवातीला त्यांनी मोलमजुरी करून उदरनिर्वाह केला नंतर 2019 मध्ये त्या अंगणवाडी सेविका म्हणून रुजू झाल्या
मोठी मुलगी प्रिया चे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण सोयगाव येथे मावशी कडे झाले अकरावी ते पदवीधर पर्यंतचे शिक्षण समाजकल्याण वसतिगृहात राहून घेतले औरंगाबाद येथे स्पर्धा परीक्षेचे क्लास केले स्पर्धा परीक्षेद्वारे करनिर्धारण अधिकारी म्हणून 15 जानेवारी 2018 ला परिषद बीड येथे रुजू झाल्या
लहान मुलगी नीताचे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण मातोश्री नथियाबाई विद्यालय सुनगाव येथे झाले तर अकरावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण हायस्कूल जळगाव जामोद येथे झाले औरंगाबाद येथे बीए झाल्यानंतर त्यांनी एम पी एस सी परीक्षा दिली आणि 17 मार्च 2020 रोजी त्यांचा निकाल लागलेला असून त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली आहे 25 एप्रिल 2021 पासून पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण नाशिक येथे होणार आहेत
अशा दुर्दम्य परिस्थितीत कोणाचीही मदत नसताना केवळ स्वतःच्या हिमतीवर कर्तृत्वावर मेहनतीवर विश्वास ठेवून दोन्ही मुलींना अधिकारी बनवणाऱ्या मातेला महिला दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम

Leave a Comment