महाराष्ट्र शासनाच्या कामाचे फलक मराठीत करण्यात यावे- मनसेची मागणी

0
344

 

गोदिया-शैलेश राजनकर

गोंदिया- महाराष्ट्र राज्यात राहणारे मराठी भाषिक अधिकारी असतांना सुध्दा गोंदियातील सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, नगर परिषद कार्यालया मार्फत जिल्ह्यात होत असलेल्या कामाचे उटघाटन, व लोकार्पणाचे फलक हे हिंदी भाषे मध्ये असल्याचे निदर्शनास येत आहेत, आपले कार्यालय हे मध्यप्रदेश, किंवा छत्तीसगढ या राज्यात नाही, महाराष्ट्र राज्यात आहे, व महाराष्ट्राची मातृभाषा हि मराठी आहे, व जनहितार्थ कामे सुध्दा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून होतात, करीता या नंतर आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून होत असलेल्या कोणत्या हि प्रकारच्या कामाचे उटघाटन किंवा लोकार्पण फलक हे फक्त मराठी भाषेतच असायला पाहिजे, याचात समनधीत अधिकाऱ्याला व ठेकेदारांना कार्यालय मार्फत कामाचे उदघाटन, लोकार्पणाचे फलक हिंदी भाषेत न लावता मराठीत असावे हि जाणीव असायला हवी होती. कारण महाराष्ट्रात राहून मराठी भाषेत अपमान शासनाच्या अधीन असणारे अधिकारी करीत असतील तर याला लाचारी म्हणावे लागणार, ज्या ज्या ठिकाणी लागलेले हिंदी भाषिक फलक मराठीत करण्यात यावे. आम्हाला हिंदी भाषेत फलक हिंदी भाषेत फलक दिसल्यास त्या फलकाला काळ लावण्यात येईल, व जे.ई.च्या तोंडाला सुध्दा काळ फसल्या जाईल, व मराठी भाषे बद्दल द्वेष असल्यामुळे हिंदी भाषेचं वापर करीत असल्यास गुणा दाखल करण्यात येईल. मराठी भाषिक अधिकारी व महाराष्ट्रात राहत असल्यावर सुध्दा जवाबदारी त्यांची जवाबदारी आहे, आपली मराठी भाषा टिकून रहावी करीता आपल्या भाषेला प्रथम प्राधान्य दिला जावे. करिता आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदिया तर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग, जि.प. कार्यालय, नगर परिषद, यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष मुकेश कुमार मिश्रा, तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे, शहर अध्यक्ष राजेश नागोसे, शहर उपाध्यक्ष क्षितिज वैद्य, रजत बागडे, व सर्व मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here