लातूर/निलंगा प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे
आज छत्रपती स्वराज्य संस्थापक, उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, सर्वसमावेशक सहिष्णू राजा,अठरापगड जातींना सोबत घेऊन बहुजन स्वराज्य निर्मिती चे जनक, प्रतिपालक
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य
श्री संजीव कदम, श्री, पाटील सर,श्री जाधव सर,श्री सूर्यवंशी सर, श्री मुजावर सर,श्री काळे सर,श्री मंदे सर,
श्री सय्यद सर,श्री जावळे सर, श्री प्रा. सूदेवाड सर,श्रीमती
तूगावे मॅडम, व सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
छत्रपती चरित्रातून प्रखर राष्ट्रप्रेम, स्वाभिमान, आणि अन्याया विरुध्द लढा देण्याची उर्जा आपल्या सर्वांना मिळते…. त्यांनी निर्माण केलेली युध्दनीती, परराष्ट्र धोरणाची गरज आजही आपल्या देशाला आहे.