मलकापूर कोविड सेंटर मध्ये २५ ऑक्सिजन बेड वाढवून द्यावे-आमदार राजेश एकडे.

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडॉऊनच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.डॉ.राजेंद्रजी शिंगणे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन बुलढाणा जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन कडक अंमलबजावणी करणे संदर्भात आढावा घेतला. सदर बैठकी मध्ये मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.राजेश एकडे यांनी मलकापूर येथील कोविड सेंटरमध्ये २५ अतिरिक्त ऑक्सिजन बेड व नांदुरा येथे ऑक्सिजन व औषधीची व्यवस्था मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मागणी केली सदर मागणीच्या अनुषंगाने मा.पालकमंत्री महोदयांनी देखील सकारात्मकता दर्शीवली,
त्याच प्रमाणे आरोग्य विभागातील रिक्त जागा तातडीने भरण्याची देखील मागणी केली.या आढावा बैठकीस बुलढाणा जिल्ह्याचे खासदार श्री.प्रतापरावजी जाधव,आमदार श्री. संजयजी रायमुलकर, आमदार श्री.संजुभाऊ गायकवाड, आमदार श्री.संजयजी कुटे, शिवसेना जिल्हा प्रमुख श्री.जालिंदरबुधवत,श्री.संतोषभाऊ रायपुरे, मा.जिल्हाधिकारी श्री.एस.राममूर्ती,जिल्हा पोलिस अधीक्षक मा.अरविंद चावरीया,जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती विसपुते मॅडम ,अप्पर जिल्हाधिकारी श्री.दिनेश गीते,जिल्हा शल्य चिकित्सक श्री.नितीन तडस,जि.प.आरोग्य विभागाचे सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी श्री.सांगळे,तसेच आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment