मराठी भाषा दिनानिमित्त मनसे तर्फे कवी यांचा सत्कार

 

गोंदिया-शैलेश राजनकर

कवी कुसुमाग्रज यांचा वाढदिवस मराठी राजभाषा, मराठी गौरव दिन म्हणून 27 फेब्रुवारी ला साजरा करण्यात येतो.त्यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा गोंदिया च्या वतीने गोंदिया येथील शासकीय विश्राम गृहात मराठी स्वाक्षरी अभियान तथा कवी, लेखक, दिग्दर्शक, वं पत्रकार असे मराठी भाषेला टिकवून ठेवणाऱ्या लोकांचा सत्कार शाल, पुष्पगुछ तथा श्रीफळ देऊन करण्यात आला. याप्रसंगी कोहमारा येथील आंतरराष्ट्रीय कविरत्न पुरस्कार प्राप्त नवोदित कवी अश्लेष माडे यांचा शाल वं श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अश्लेष माडे यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेविषयी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. व मराठी भाषेला अभिजात दर्जा कसा प्राप्त होईल यावर आपले मनोगत व्यक्त केले. या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष मा. मनिषभाऊ चौरागडे, हेमंतजी लिल्हारे, जिल्हा उपाध्यक्ष मुकेशजी मिश्रा,तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे तर सत्कार मूर्ती म्हणून माणिकजी गेडाम (कवी, साहित्यिक ), जयंतजी शुक्ला (लोकशाही वार्ता), हिदायत शेख (देशोन्नती), दिनेश फरकुंडे (दिव्यांग मराठी चित्रपट निर्माते ), दिलीप कोसरे (दिव्यांग मराठी चित्रपट दिग्दर्शक), मिलन रामटेककर (सरपंच फुलचूर ग्रामपंचायत)आदी उपस्थित होते. आयोजक म्हणून राजेश नागोसे, क्षितिज वैद्य, रजत बागडे, खेमा ठाकरे, रोहित उके, निर्वाण वानखेडे, राहुल वाकरे, संदीप राहुलकर, सुमित कावळे, शुभम चौहान, राना नागपुरे, अमोल लांजेवार सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष आदी उपस्थित होते.

Leave a Comment