मनसे पदाधिकारी यांचा भंडारा व गोंदिया जिल्ह्याचा दौरा संपन्न

0
246

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब यांनी भंडारा जिल्हा संपर्क अध्यक्ष म्हणून श्री मंदिप रोडे तर गोंदिया जिल्हा संपर्क अध्यक्ष म्हणून राहुल बालमवार यांची नियुक्ती केली, त्यानंतर पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व या भागातील एक जवाबदार पदाधिकारी म्हणून *हेमंतभाऊ गडकरी* यांनी नवीन जवाबदारी स्वीकारलेल्या श्री मंदिप रोडे व श्री राहुल बालमवार या सहकाऱ्यांना घेऊन नुकताच भंडारा व गोंदिया जिल्ह्याचा दौरा केला, दोन्ही ठिकाणी विश्रामगृहात झालेल्या बैठकीत श्री रोडे व श्री बालमवार यांनी स्थानिक पदाधिकारी यांचा सन्मान ठेवत पक्ष बांधणीच्या अतिशय उत्तम सूचना उपस्थिताना केल्या ,यावेळी काहींनी मनसेत प्रवेश घेतला तर तेथील जिल्हाअध्यक्षाच्या सूचनेनुसार काहींना पदाची जवाबदारी देण्यात आली, यात महिलांचा सुद्धा समावेश होता भंडारा येथील बैठकीत जिल्हा अध्यक्ष नितीन वानखेडे, शहर अध्यक्ष नितीन खेडीकर, उपजिल्हाअध्यक्ष शैलेश गजभिये, तालुका अध्यक्ष रवी मानकर,दिनेश व हर्षल भजनकर, अतुल उके, भोजराज कांबळी,शुभम डहाके*,व इतर पदाधिकारी उपस्थित होते तर गोंदिया येथील बैठकीत जिल्हा अध्यक्ष मनीष चौरागडे व हेमंत लिल्हारे,उपजिल्हाअध्यक्ष मुकेश मिश्रा व मुन्ना गवळी,तालुका अध्यक्ष ब्रजभूषन बैस, रजत बागडे, शुभम चोपडे, बाळू वंजारी, राजेश सोनवणे,सौ किरणताई बोपचे, कु योगिता वघारे, सौ लांजेवार, सौ चुटे* व इतर उपस्थित होते, सर्व पदाधिकारी यांनी हेमंतभाऊ गडकरी व दोन्ही संपर्क अध्यक्षानी केलेल्या पक्ष बांधणीच्या सूचना नक्कीच कृतीत आणू व 2 एप्रिल रोजी शिवाजी पार्क मुंबईत होणाऱ्या गुडीपाडवा मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने येऊ असा आशावाद व्यक्त केला…..श्याम पुनियानी, पूर्व विदर्भ विभागीय कार्यालय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here