गोंदिया-शैलेश राजनकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदिया तालुक्याच्या वतीने छोटा गोंदीया जवळून वाहणारी एकमेव नदीचे सौंदर्यीकरण,नदी पात्र खोलीकरण व नव्याने बंधारा बांधण्यात यावा यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता.पांगोली नदी पात्रात बारो महिने पाणी राहणार व नदीच्या आजू बाजूच्या शेतकरी बंधूंना पाण्यामुळे वेगवेगळी पिके व भाजी पाला व्यवसाय करण्यास मद्दत होईल,पाळीव व वन्य प्राण्यांना पिण्या करीता पाणी उपलब्ध होईल.भविष्यात पाण्याची कमतरता छोटा गोंदिया भागात होणार नाही या महत्वाच्या मुद्यांवर तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे यांनी जिल्हाधिकारी काळे साहेब व जिल्हापरिषद मुख्य कार्यपालन अधिकारी रवींद्र ठाकरे साहेब व जिल्हा परिषद अध्यक्ष मडावी ताई याच्याशी चर्चा केली होती.२०१४ ते २०२१ पर्यंतच्या पांगोली नदीच्या कार्याच्या पाठपुराव्याला अखेर मंजुरी मिळाली.
मनसे गोंदिया तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे व त्यांच्या समस्त सहकाऱ्यांनच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब गोंदिया,जिल्हापरिषद मुख्याधिकारी,जिल्हा परिषद अध्यक्ष,अभियंता यांचे आभार व्यक्त करण्यात आले.