मनसेचा_१_दिवसीय_धरणे_आंदोलन

 

गोंदिया. दिनांक ०२ फेब्रुवारी रोजी मंगळवारी सकाळी ११:०० वाजता पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे, जिल्हाअध्यक्ष हेमंत लिल्हारे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन घेण्यात आले, या आंदोलना मध्ये कोरोनाच्या काळात लाॅकडाऊन नंतर जेमतेम सामन्य जनता कसेबसे आपल्या कामधंदा किंवा व्यापाराच्या गाढ्या सावरत असतांनाच केंद्र सरकारने पेट्रोल, गॅस, डिझेल दर वाढविले ते कमी करावे तसेच राज्य सरकारने लाॅकडाऊनच्या काळात ३ महिन्याचे वाढीव वीज बील माफ करण्यात यावे, या संदर्भात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या जाहीर निषेध करण्यात आले. आणि बिरसी विमानतळ येथील प्रकल्पग्रस्त कामगार यांना कामावरून काढून टाकले, एकूण ४४ युवकांना या प्रकल्पात सुरक्षा म्हणून कामावर घेतले त्यांच्या या सेवेला आता १३ ते १४ वर्ष झालेले आहे एवढ्या वर्षांनंतर आता. या सर्वांना परत कामावर घेण्यात यावे. तसेच गोंदिया शहरातील प्रमुख व अन्य मागण्या छोट्या गोंदिया येथील प्राथमिक व हायस्कूलची जिर्ण इमारतीला ७० ते ८० वर्ष झाले असून ती इमारत पाडून नवीन इमारत तयार करण्यात यावी, गोंदियातील मोक्षधाम परिसरा समोर घण कचरा (डम्पींग यार्ड) ची व्यवस्था शहरातून बाहेर करण्यात यावे,
जिल्हा अधिकाऱ्याच्या शासकीय इमारतीचे व रोडाचे (सौंदर्यीकरण) बांधकाम विना टेंडर परवानगी करण्यात आले. त्यातील दोषी कार्यकारी अभियंता जावेद यांच्यावर कार्यवाही करण्यात यावे, जिल्हा परिषद मधील समाज कल्याण विभाग कार्यालयात ऐ.सी. न लावता दोन वेळा बिल काढणाऱ्या अधिकारी व ठेकेदावर गुन्हा दाखल करण्यात यावे, गोंदिया शहराला लागत एकमेव पांगोली नदी चे सौदर्यकरण करण्यात यावे ह्या सर्व मांगाना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे घेवून, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष मुकेश कुमार मिश्रा, जिल्हा उपाध्यक्ष लेखू रहांगडाले, गोंदिया तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे, सालेकसा तालुका अध्यक्ष ब्रजभुषण बैस, गोरेगांव तालुका अध्यक्ष शैलेश जांभूळकर, गोंदिया शहर अध्यक्ष राजेश नागोसे, गोंदिया शहर उपाध्यक्ष क्षितिज वैद्य, रजत बागडे, जिल्हा सचिव निखिल ढोंगे, अमोल लांजेवार,राणासिंह नागपुरे, रोहित उके, अमित अग्रवाल, दिलीप ढेकवार, हेमराज ठाकरे, मंगेश चौबे, प्रकाश फंटीग, नितिन पटले, सागर गौतम, सुरेश पटले, कमरुदीन शेख, उत्तम गुरवेले, अभव श्यामकुवर, प्रदिप नैकाते, पंकज वंजारी, सकिम शेख, दिनेश हेमणे अरविंद पण्डेले, विजय चंदेल, सुभाष निरवाडे, अशोक उपवंशी,सुधाकर कांबळे, रजनिस धमगाये, अंकित भैरम, झुल्लासिंह बरेले लोकेश बनाफट, निखिल गडपायले, संदीप चवरे व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..

Leave a Comment