मनब्दा येथे दोन वृध्द शेतकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

 

अडगांव बु प्रतिनिधी दिपक रेळे

तेल्हारा तालुक्यातील मनब्दा येथिल शेतात विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने दोन वृध्द शेतकऱ्यांचा मृत्यू झाला ची घटना शुक्रवार ४संप्टेबर रोजी सकाळी दहा वाजता सुमारास घडली पांडुरंग अमृता पाथ्रीकर वय ७०व रामकृष्ण संपत शिखरे वय ७४अशी मृतकाचे नावे आहेत मनब्दा येथिल पांडुरंग पार्थिकर व रामकृष्ण शिखरे हे दोघेही मित्र असुन ते नेहमी सोबत राहायचे शुक्रवारी हे दोघेही गावातील सहदेव खराबे यांच्या शेतात अंबाडी ची भाजी आणायला गेले होते तेथे विहीर जवळ च्या विजेच्या विघुत खांबाला स्पर्श झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी यांनी शेतात धाव घेतली दोघेचेही मृतदेह विहीर जवळ पडलेले आढळुन आले तेल्हारा पोलिस यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा येथे पाठविण्यात आले या घटनेमुळे मनब्दा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे

Leave a Comment